Farmer succes story : भारत हा एक कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे, देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहे. मात्र असे असताना देखील देशातील शेतकरी बांधवांना गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
शेती व्यवसायात प्रामुख्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी बांधवांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. याशिवाय देखील शेतकरी बांधवांना (Farmers) इतर अन्य कारणांमुळे शेती व्यवसायात नुकसान सहन करावे लागते.
यामध्ये पारंपरिक पद्धतीचा देखील समावेश आहे शिवाय रासायनिक खतांचा वाढता वापर देखील उत्पादन कमी करण्यास कारणीभूत ठरत आहे. मात्र असे असले तरी देशात असे अनेक शेतकरी बांधव आहेत ज्यांनी रासायनिक खतांचा वाढता वापर व त्यापासून होणारे दुष्परिणाम ओळखून आता सेंद्रिय शेतीची कास धरली आहे.
विशेष म्हणजे सेंद्रिय शेतीची फक्त कासच धरली नसून यातून चांगला बक्कळ पैसा देखील छापत आहेत. मित्रांनो आपले शेजारील राज्य मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये एका शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीला एक फायदेशीर व्यवसाय बनवला आहे. बैतूलच्या मौजे बागोली येथे राहणारे जयराम गायकवाड हे सुशिक्षित शेतकरी आहेत.
त्यांनी इतिहासात एमए केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर जयराम यांना तब्बल 3 सरकारी नोकरीच्या ऑफर आल्या, पण त्यांनी या नोकऱ्या नाकारल्या आणि शेतीची निवड केली. जयराम यांना अगदी लहानपणापासून शेती व्यवसायाची मोठी आवड होती. यामुळे आपल्या आवडीलाचं त्यांनी निवडले.
जयराम यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि पारंपारिक शेतीऐवजी त्यांनी शेतीमध्ये काहीतरी हटके करण्याचे ठरवले. या अनुषंगाने त्यांनी सेंद्रिय शेती सुरू केली. त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी जणूकाही वरदानच सिद्ध झाला. आज ते सेंद्रिय शेती आणि दुग्धव्यवसायातून वार्षिक 30 लाख रुपये कमवत आहेत.
जयराम यांनी हा प्रवास सुरू केला तेव्हा त्यांच्याकडे 2 गायी आणि 30 एकर शेती होती. त्यांनी जरी 2 गाईचे संगोपन करत दुग्धव्यवसाय सुरू केला असला तरी आजच्या मितीला त्यांच्याकडे 60 हून अधिक गायी आहेत.
भारताचे वर्तमान पंतप्रधान तसेच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय नरेंद्र जी मोदी यांनी जयराम यांच्या कार्याचा गुणगौरव देखील केला आहे.मित्रांनो खर पाहता 54 वर्षीय जयराम जयराम हे शेतकरी कुटुंबातील आहेत.
त्यांचे वडील पारंपरिक शेती करायचे. शिक्षणादरम्यान जयराम सीआरपीएफमध्ये नोकरीची संधी मिळाली. यानंतर सैन्यात कारकून आणि नंतर रेल्वेतकाम केले. जयरामला नोकरी करावीशी वाटली, पण त्याला आपली मायभूमी सोडायची नव्हती.
मग काय त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा एक मुलगा लोकेश गायकवाड हा देखील त्यांच्या मार्गावर चालत असून रेवा पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेत आहे.
रासायनिक खतांचा वापर करूचं नका
सेंद्रिय पद्धतीने शेतीचे आधुनिकीकरण करण्याची कल्पना त्यांना कृषी विभागाच्या दौर्याच्या कार्यक्रमातून आणि स्वतःच्या कुतूहलातून सुचल्याचे जयराम यांनी सांगितले. आपल्या भावांसोबत जयराम 30 एकर शेतजमिन कसत असून तो शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा आणि रासायनिक खतांचा अजिबात वापर करत नाही.
तो पिकाच्या चांगल्या वाढीसाठी शेणखताचा तसेच गांडूळ खतांचा शिवाय कंपोस्ट खताचा वापर करत असतो. त्यांच्याजवळ असलेल्या 30 एकरपैकी 9 एकरात तो फक्त गहू आणि उसाची लागवड करतो. सेंद्रिय शेतीमुळे त्यांचा गहू 30 रुपये किलोने विकला जातो.
याशिवाय गुळाला देखील 60 रुपये किलो एवढा भाव मिळतं आहे. याशिवाय ते उर्वरित शेतात टोमॅटो, वांगी यासह इतर फळे आणि भाजीपाला पिकवतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न 30 लाख रुपये आहे.
जयराम यांनी 2012 मध्ये 2 गायींसह गायी पाळण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी शेतीसोबतच डेअरी फार्मिंग व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यास सुरुवात केली. आणि मग काय अवघ्या 10 वर्षात त्यांनी या व्यवसायात मोठी भरारी घेतली आणि आता हल्ली त्यांच्याकडे 60 हून अधिक संकरित आणि देशी गायीं आहेत. याशिवाय ते गोबर गॅसद्वारे घरगुती गॅस आणि वीज बनवतात. यासोबतच शेणापासून गांडूळ कंपोस्ट खत तयार करून ते आपल्या पिकांच्या वाढीसाठी वापरतात.
गोबर गॅसचा वापर
जयराम यांनी गायींसाठी शेड अशा प्रकारे बांधले आहे की जनावरांचा कचरा थेट शेडच्या मागे असलेल्या गोबर गॅस प्लांटमध्ये नाल्यांद्वारे जमा होतो. गॅस प्लांटमधून सोडलेला कचरा पुढील टाक्यांमध्ये जातो, जी गांडूळ खताची प्रारंभिक प्रक्रिया आहे.
येथून हा कचरा सेंद्रिय खताच्या स्वरूपात तयार होतो. हे अन्न त्यांच्या पिकांसाठी रामबाण औषध ठरते. जयराम यांनी एकूण 8 मुलांना आपल्या शेतात रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. यामुळे निश्चितच त्या मुलांचा देखील मोठा फायदा होत आहे.
जयराम यांनी आपल्या व्यवसायाबद्दल माहिती देताना सांगितले की, त्यांना दररोज 150 लिटर दुधाचे उत्पादन मिळतं आहे. मिळालेल्या दुधापासून जयराम मावा, पनीर, दही, तूप यासह इतर दुग्धजन्य पदार्थ बनवतो.
जयराम गोबरगॅसपासून वीज तयार करतो आणि जनरेटर चालवतो, मावा मशीन चालवतो. धान्य बारीक करण्यासाठी गिरणी चालवतात. जयराम सांगतात की दररोज 60 गायी शेणखत तयार करतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात शेणखत तयार होते आणि एका महिन्यात 300 क्विंटल खत तयार होते.
निश्चितच जयराम यांनी शेती क्षेत्रात मिळवलेले हे यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारे सिद्ध होणार आहे. यामुळे भविष्यात जयराम यांच्यासारखे अनेक शेतकरी उदयास येतील यात तिळमात्र देखील शंका नाही.