Farmer Success Story: ‘या’ शेतकऱ्याने वॉटर चेस्टनटची लागवड करून 6 महिन्यात कमावला लाखोत नफा! काय आहे नेमके वॉटर चेस्टनट?

water chestnut

Farmer Success Story:- शेतीमध्ये शेतकरी आता अनेक नवनवीन पिकांच्या लागवडीचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर करतात व हे प्रयोग करत असताना त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रयोग यशस्वी देखील करतात व त्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळवतात.

पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता ज्या पद्धतीने तंत्रज्ञान किंवा व्यवस्थापन महत्त्वाचे असते. अगदी त्याचप्रमाणे नैसर्गिक परिस्थिती देखील चांगली असणे तितकीच गरजेची असते. मग ती पाण्याबद्दल असो किंवा माती असो या सगळ्या परिस्थितीचा चांगला किंवा वाईट परिणाम हा पिकांच्या उत्पादनावर होत असतो.

त्यामुळे शेतकरी नैसर्गिक परिस्थितीचा विचार करून देखील पिकांचे नियोजन करतात. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण बिहार राज्यातील मधुबनी  येथील बिंदेश्वर रावत नावाच्या प्रगतिशील  शेतकऱ्याचा विचार केला तर यांनी  अशाच एका पिकाचे प्रयोग यशस्वी केला असून या माध्यमातून लाखोत उत्पन्न देखील मिळवले आहे.

 वाटर चेस्टनट लागवडीतून मिळवले लाखोत उत्पन्न

बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्याचा विचार केला तर हा बिहारमधील सर्वात जास्त पूरग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये बिंदेश्वर रावत हे प्रगतिशील शेतकरी राहतात. या पूरग्रस्त भागाचा विचार केला तर या ठिकाणी कमीत कमी वर्षातील सहा महिने पाणी साचलेले राहते.

हे साचलेले पाणी येथील शेती समोरील सगळ्यात मोठी समस्या आहे. परंतु बिंदेश्वर रावत यांनी या समस्येवर मात करण्याकरिता वॉटर चेस्टनटची नैसर्गिक पद्धतीने लागवड केली असून या माध्यमातून त्यांनी सहा ते सात महिन्यांमध्ये एका हेक्टरला दीड लाख रुपये नफा मिळवला आहे.

याबद्दल बिंदेश्वर रावत यांनी म्हटले की, याकरिता एक हेक्टर तलावातून सुमारे दहा ते शंभर क्विंटल पर्यंत वॉटर चेस्टनट पिकाचे उत्पादन घेतले जाते व या नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून तुम्ही सहा ते सात महिन्यांमध्ये दीड लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकतात.

 काय आहे नेमके वॉटर चेस्टनट हे पीक?

वॉटर चेस्टनट प्रजातींचे दोन प्रकार असून यातील एक काटेरी असते व एक बिगर काटेरी असते. शेतकरी प्रामुख्याने बिगर काटेरी असलेल्या वानांची निवड करतात. कारण जर काटेरी वानांची लागवड केली तर मात्र हार्वेस्टिंगला खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होतात.

जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये वाटर चेस्टनट पिकासाठीची नर्सरी म्हणजेच रोपवाटिका तयार करावी लागते  व त्याची एक मीटर लांबीची वेल जून ते जुलै महिन्यामध्ये तलावात लावावी लागते. रोपवाटिका तयार करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की याकरिता फळे जानेवारी महिन्यापर्यंत भिजत ठेवणे गरजेचे आहे आणि उगवण होण्यापूर्वी त्यांना शेतामध्ये किंवा कुंडीत लावावीत.

लागवड करताना कमीत कमी दोन ते तीन फूट पाणी असणे गरजेचे आहे. जुलै महिन्यामध्ये पावसाळ्यात एक मीटर अंतरावर चौरस पद्धतीने याची लागवड करावी लागते. तुम्ही शेतामध्ये किंवा तलावात याच्या रोपांची पुनर्लावणी करतात तेव्हा पाण्याचे प्रमाण पुरेसे असणे गरजेचे आहे.

आपण मधुबनी या ठिकाणचा विचार केला तर या ठिकाणी नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये शेतात पाणी तुंबलेले राहते. परंतु जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतात पाणी नसते व त्यावेळी उन्हाळी हंगामातील मूग किंवा उडीद त्या ठिकाणी पेरले जाते. यामध्ये आयसीएआरचे म्हणणे आहे की पीक रोटेशन मध्ये वाटर चेस्टनटचा समावेश करणे गरजेचे आहे.

 वॉटर चेस्टनट का आहे फायद्याचे?

ही जलीय म्हणजेच पाण्यात  लागवड केले जाणारे पीक असून कच्चे फळ म्हणून त्याची लागवड केली जाते. ज्या ठिकाणी तलाव किंवा पानथळ जमिनी आहेत आणि तीन फुटापर्यंत पाणी साचलेले एखाद्या ठिकाण असेल तर अशा ठिकाणी ते सहज पिकवता येणे शक्य आहे.

वॉटर चेस्टनट हे पोषक तत्त्वांनी समृद्ध असून त्याचे पीठ उपवास आणि सणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. तसेच याच्या ताज्या आणि हिरव्या फळांच्या सालीपासून स्वादिष्ट भाजी देखील बनते. चेस्टनेट फळाचे सेवन केल्याने मधुमेह तसेच दमा आणि मुळव्याध असलेल्या रुग्णांना खूप मोठा फायदा होतो. यामध्ये कॅल्शियम तसेच महत्त्वाचे जीवनसत्वे व इतर खनिजे जास्त प्रमाणात आढळून आल्याने आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील हे महत्त्वाचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe