Ahilyanagar News: संगमनेर तालुक्यात हक्काचे पाणी मिळावे यासाठी शेतकरी आक्रमक संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पाईप का फोडले ?

Published on -

Ahilyanagar News:लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील जनते करता निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा पूर्ण केला. या कालव्यातून तीन रोटेशन झाले .मात्र प्रत्येक वेळी संगमनेर तालुक्याला डावलण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कालव्यावर पाईप हे पाईप प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता फोडल्याने शेतकरी संताप झाले असून सुमारे 500 शेतकऱ्यांनी रात्रभर आंदोलन करून जलसंपदा विभाग व प्रशासनाला धारेवर धरले.

सध्या उन्हाळी आवर्तनातून उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सुरू आहे. हे पाणी संगमनेर तालुक्यातून पुढे जात असताना तालुक्याला मात्र पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. याबाबत नवीन लोकप्रतिनिधी याने सर्व बांधारे भरून घेऊन अशी पेपरबाजी केली.वस्तुस्थितीमध्ये त्यांना शेतकऱ्यांशी काही घेणे देणे नाही.

डाव्या व उजव्या कालव्यातून मागील दोन वर्षात तीन आवर्तने झाली मात्र संगमनेर तालुक्याला प्रत्येक वेळी टाळण्यात आले. याबाबत शेतकऱ्यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केला. लोकनेते थोरात यांनीही प्रशासनाला संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी रास्त असून त्यांना पहिले पाणी मिळाले पाहिजे यासाठी आपण काम करावे अशा सूचना दिल्या. मात्र प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या दबावात आहे. त्यांनी संगमनेरला पाणी दिले नाही. हक्काचे पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. अशावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून उजव्या व डाव्या कालव्यावरील विविध गावांमधील शेतकऱ्यांसाठी सुमारे दोन कोटी रुपयांच्या पाईप उपलब्ध करून देण्यात आले.

हे पाईप शेतकऱ्यांनी उजव्या व डाव्या कालव्यावर टाकून आपल्या शेतीसाठी पाणी घेतले. उजव्या कालव्यावर निमगाव खुर्द ते खळी यामधील विविध गावांमधील शेतकऱ्यांनी पाईपद्वारे पाणी उचलले तर डाव्या काले हो पिंपळगाव कोंझिरा ते लोहारे येथील कदम वस्ती या संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाईप द्वारे पाणी उचलले.

उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांसाठी पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे पाणी उचलले आहे असे असताना प्रशासनाने मात्र शेतकऱ्यांचे काही न ऐकता रात्री अपरात्री येऊन सर्व पाईप फोडून टाकले त्यामुळे सर्व शेतकरी संतप्त झाले

सुमारे 500 शेतकऱ्यांनी शिरापूर येथे इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित प्रशासनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. यावेळी पोलीस संरक्षण ही मागवण्यात आले परंतु शेतकऱ्यांची रास्त मागणी ऐकल्यानंतर पोलीस प्रशासनाने ही जलसंधारण अधिकाऱ्यांना चुकीच्या गोष्टीची जाणीव करून दिली. इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या पुढाकारातून या शेतकऱ्याच्या आंदोलनाला यश आले असून यापुढे पाईप फोडणार नाही असे या अधिकाऱ्यांनी लेखी दिले आहे.

यावेळी बोलताना तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय राहणे म्हणाले की,संगमनेर तालुक्याच्या बाहेरील 16 किलोमीटर लांबी करता 20 दिवस पाणी आणि अकोले व संगमनेर तालुक्यातील 75 किलोमीटर लांबी कालव्या करतात फक्त 17 दिवस पाणी हा कुठला न्याय असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.

तर संताप शेकडो शेतकऱ्यांनी स्थानिक आमदार तलाव आणि बंधारे भरून देण्याच्या घोषणा करतात मात्र प्रत्यक्षात पाणी मिळत नाही. पाईप फोडले जातात त्यावर ते काही बोलत नाही प्रशासनावर कोणाचा धाक आहे अशा प्रकारची आक्रमक भूमिका घेतली. इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या मध्यस्थीनंतर शेतकरी शांत झाले.

यावेळी शेकडो शेतकरी व महिला रस्त्यावर उतरल्याने रात्रभर उजव्या व डाव्या कालव्यावर प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुरू होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News