Farming Buisness Idea:मित्रांनो भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे कारण की, येथील बहुतांश लोकसंख्या आजही उदरनिर्वाहासाठी शेतीवर (Farming) अवलंबून आहे. भारतीय शेतीत आता काळाच्या ओघात बदल देखील बघायला मिळत आहे. बदल करणे काळाची गरज देखील बनले आहे.
देशातील शेतकरी बांधव (Farmers) आता बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांची शेती करू लागले आहेत शिवाय अशा पिकांची शेती करीत आहेत ज्या पिकांमधून कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवता येणे शक्य असते.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना सल्ला देतात की, कमी वेळेत जास्त पिके घ्यावीत जेणेकरून नफा जास्त मिळेल. शेतकरी बांधव देखील आता सतत यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे आज आपण कमी कालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या काही भाजीपाला वर्गीय पिकांची माहिती जाणून घेणार आहोत.
मुळा लागवड (Radish planting)
मुळा लागवड वर्षभर केली जाऊ शकते आणि हे पीक लवकर काढणीस देखील तयार होतं असते. मुळा लागवड केल्यानंतर अवघ्या 50 दिवसांनी बाजारपेठेत विक्रीसाठी नेला जाऊ शकतो. त्याची पाने हिरव्या भाज्या बनवण्यासाठी वापरतात आणि त्यांच्या मुळापासून म्हणजे कंदपासून देखील भाजी बनवली जाते, तसेच यापासून कोशिंबीर किंवा रायता देखील बनवतात.
खरबूज शेती (Muskmelon Farming)
खरबूजाचे पीक हे वर्षातून एकदाच घेतले जाते. याची लागवड उन्हाळ्यात केली जाते. खरबूज हे खायला खूप चविष्ट आणि आरोग्यदायी असल्याने याची बाजारात मोठी मागणी असते. याला उन्हाळ्यात चांगला दर देखील मिळत असतो. याच्या शेतीची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्या शेतीसाठी पाणी खूपच कमी लागतं असते.
काकडी शेती (Cucumber Farming)
काकडी हे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात असे दोन हंगामात घेतले जाणारे पीक आहे. हे सर्वात वेगाने वाढणारे पीक म्हणुन देखील ओळखले जाते. हे पीक जास्त हिवाळा सहन करण्यास सक्षम नसते, म्हणून याची उन्हाळ्यात लागवड करण्याचा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देत असतात. हे देखील कमी वेळेत जास्त उत्पादन देणारे हे पीक आहे.
टरबूज शेती (Watermelon Farming)
हे देखील फक्त उन्हाळ्यात घेतले जाते. टरबूज लागवडीसाठी उष्ण हवामान आवश्यक असल्याने उन्हाळी हंगाम त्यांच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. टरबूज देखील उन्हाळी हंगामात चांगल्या दरात विकले जाते. शिवाय अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होत असल्याने याची शेती शेतकऱ्यांना विशेष फायद्याची ठरू शकते.
कोथिंबीर शेती (Cilantro farming)
कोथिंबीरचे पीक पेरणीनंतर 50 दिवसांनी काढणीसाठी तयार होत असते. म्हणजेच अवघ्या दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी यापासून उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. कोथिंबीर शेतात तसेच घरांमध्ये कुंडीत लावता येते. कोथिंबिरीवर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी असतो, त्याचप्रमाणे या पिकासाठी पाणी देखील कमी प्रमाणात लागते. उन्हाळा आणि पावसाळ्यात याची लागवड केली जाते.
पालक शेती (Spinach farming)
पालक हे पीक देखील लवकर काढण्यासाठी तयार होत असते. हे पीक पेरणी केल्यानंतर मात्र 50 दिवसांनी उत्पादन देण्यास सज्ज होत असते. मित्रांनो या पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे वर्षभर घेतले जाणारे पीक आहे. निश्चितच याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे.