काय सांगता ! 50 हजार रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या ‘या’ पिकाची शेती शेतकऱ्यांना बनवणार धनवान ; लागवडीची पद्धत जाणून घ्या

Ajay Patil
Published:
farming business idea

Farming Business Idea : अलीकडे भारतीय शेतीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. काळाच्या ओघात केलेला बदल कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलू पाहत आहे. जाणकार देखील शेतकऱ्यांना शेतीमध्ये बदल करण्याचा सल्ला देत असतात.

शेतकऱ्यांनी जर पीक पद्धतीत बदल केला तर निश्चितच त्यांना अधिक उत्पन्न मिळू शकते. कृषी तज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी बाजारात मागणी मध्ये असलेल्या पिकांची लागवड केली पाहिजे जेणेकरून त्यांना अधिक उत्पन्न मिळू शकते.

व्हॅनिला हे देखील असंच एक पीक असून या पिकाला बाजारात कायमच मागणी असते आणि दर देखील विक्रमी मिळत असतो. या पिकाला बाजारात 50 हजार रुपये प्रति किलो पर्यंतचा बाजारभाव मिळत असतो. अशा परिस्थितीत आज आपण या पिकाच्या लागवडीची पद्धत जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.

व्हॅनिला एक वेलवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीचे देठ लांब आणि दंडगोलाकार असते. त्याची फुले कॅप्सूलच्या आकारासारखी असतात. याच्या फुलांचा सुगंध खूप छान असतो. फुले सुकल्यावर त्याची पावडर बनवली जाते. व्हॅनिलामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील आढळतात, जे पोट स्वच्छ ठेवण्यास आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.

व्हॅनिला अर्कचा वापर कुठं केला जातो बरं 

व्हॅनिला वनस्पतीपासून मिळणाऱ्या अर्काला बाजारात मोठी मागणी आहे. कारण त्याचा अर्क आइस्क्रीममध्ये चव किंवा फ्लेवर म्हणून खास वापरला जातो. याशिवाय परफ्यूम बनवण्यासह अनेक प्रकारच्या मिठाईंमध्ये याचा वापर केला जातो. अशाप्रकारे, केशरानंतर हे दुसरे सर्वात महाग पीक आहे, ज्याचे उत्पादन करून शेतकरी खूप चांगला नफा मिळवू शकतात.

व्हॅनिला लागवडीसाठी हवामान कसे असावे बरं 

व्हॅनिला लागवडीसाठी सावलीची जागा आवश्यक असते. त्याच्या लागवडीसाठी मध्यम तापमान असावे. खूप गरम किंवा खूप थंड हवामान योग्य नसते. शेडनेट हाऊसमध्ये याची लागवड सहज करता येते. त्याच्या रोपाला सावलीची जागा आणि हलका प्रकाश मिळत राहिला पाहिजे तरच त्याची वाढ होऊ शकते.

व्हॅनिला लागवडीसाठी योग्य माती

व्हॅनिला लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी माती आवश्यक असते. त्याचे pH मूल्य 6.5 ते 7.5 पर्यंत असावे. व्हॅनिला लागवड करण्यापूर्वी, मातीची चाचणी करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर त्यातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी खतांचा वापर केला पाहिजे.

व्हॅनिला बियाणे कसे पेरायचे बरं 

व्हॅनिला वेल म्हणून वाढते. म्हणूनच त्याच्या पेरणीसाठी बियाणे आणि कलमे दोन्ही वापरता येतात. व्हॅनिला लागवड करण्यापूर्वी शेतात खड्डे करावेत. हे खड्डे काही वेळ उन्हात तसेच मोकळे सोडावेत. त्यानंतर या खड्ड्यांमध्ये कुजलेले खत टाकावे. वेल पसरवण्यासाठी मंडप तयार केला पाहिजे. वेल लावण्यासाठी फाउंटन पद्धतीने पाणी द्यावे. यानंतर, तारांवर वेल पसरवले पाहिजे.

व्हॅनिला वनस्पतींची काळजी कशी घ्यावी

या पिकाला वेळोवेळी चांगले खत घालत रहा. यासाठी तुम्ही त्यात शेणखत, गांडुळ खत वापरू शकता. याशिवाय 100 लिटर पाण्यात एक किलो एनपीके मिसळून फवारावे.

व्हॅनिला पीक किती वेळेत तयार होते

9 ते 10 महिन्यांनंतर, व्हॅनिलाच्या वेलीमध्ये फुले आणि बीन्स पिकण्यास सुरवात होते. यानंतर रोपातून बिया काढल्या जातात. या बियाण्यांवर वेगवेगळ्या प्रक्रियेतून जावे लागते. यानंतर व्हॅनिला मिळते.

याची किंमत किती असते

व्हॅनिला भारतात 40 ते 50 हजार रुपये प्रतिकिलो दराने विकला जातो. शेतकऱ्यांनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास त्यांना चांगला नफा मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe