Farming Business Idea : अनेकजण शेती करत असताना त्यासोबत एक छोटासा व्यवसाय करण्याचा विचार करत असतात. मात्र शेतीसोबत कोणता व्यवसाय करायचा हे अनेकांना समजत नाही. मात्र तुम्ही तुमच्या नापीक जमिनीत एक भन्नाट व्यवसाय सुरु करू शकता.
तुमचीही जमीन नापीक असेल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या नापीक जमिनीत बांबू शेती करू शकता. सरकारकडून बांबू शेतीला अनुदान देखील दिले जात आहे. त्यामुळे बांबू शेती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
अनेकजण आजही पारंपरिक शेती करत आहेत. मात्र पारंपरिक शेती करून अनेकांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण जात आहे. त्यामुळे पारंपरिक शेती न करता बांबूची शेती करू शकता. मध्य प्रदेश सरकारकडून बांबू शेतीला 50 टक्के अनुदान देखील दिले जात आहे.
बांबूची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. फार कमी लोक बांबूची शेती करत आहेत. तुम्ही बांबूची शेती करून चांगली कमाई करू शकता. यामधून तुम्ही चांगले उत्पन्न देखील मिळवू शकता. बांबूची एकदा लागवड केल्यानंतर अनेक वर्षे यामधून नफा मिळेल.
बांबूची लागवड कशी करावी?
तुम्ही बांबूची लागवड तुमच्या नापीक किंवा मोकळ्या जागेत देखील करू शकता. बांबूची शेती करण्यासाठी माती जास्त वालुकामय नसावी. 2 फूट खोल आणि 2 फूट रुंद खड्डा खोदून बांबूची लागवड करावी.
शेणखत टाका आणि पाणी द्या. 6 महिने आठवड्यातून एकदा पाणी द्या. एक हेक्टर जमिनीत 625 बांबू रोपे लावता येतात. यासाठी तुम्हाला खर्च देखील कमी येईल.
राष्ट्रीय बांबू मिशन
भारत सरकारकडून 2006-2007 मध्ये राष्ट्रीय बांबू मिशन सुरू केले आहे. बांबूची झाडे वेळोवेळी कापून त्यांची छाटणी करावी लागते. बांबूचे रोप अवघ्या तीन महिन्यांत वाढू लागते. 3 ते 4 वर्षात बांबूचे पीक तयार होते.
बांबूपासून बक्कळ पैसे कमवा
एकदा तुम्ही बांबूची लागवड केली तर 40 वर्षे यातून नफा कमवू शकता. बांबू लागवडीतून 4 वर्षात 40 लाख रुपये कमावता येतात. तसेच बांबू शेतीमध्ये तुम्ही इतर तीळ, उडीद, मूग-हरभरा, गहू किंवा मोहरी पिकाची देखील लागवड करू शकता. त्यामुळे तुमच्या कमाईत वाढ होईल.