Farming Business Idea : आजकाल अनेकजण नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. सर्वात महत्वाची अडचण म्हणजे पैशांची कमतरता.
तुम्हालाही नोकरी न करता व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच तो तुम्हाला नोकरीपेक्षा चांगला बक्कळ पैसे कमवून देऊ शकतो. आज तुम्हाला शेतीसंबंधित एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्यामधून तुम्ही चांगली कमाई करू शकता.
आजकाल उच्चशिक्षित तरुण देखील नोकरी न करता शेतीकडे वळत आहेत. यामधून ते दरमहा लाखो रुपये कमवत आहेत. तुम्ही बोरांची लागवड करून त्यातून चांगली कमाई करू शकता.
बोर हे अनेकांच्या आवडीचे फळ आहे. त्याला बाजारात मागणी देखील चांगली आहे. त्यामुळे तुम्ही बोराच्या झाडांची लागवड करून चांगली कमाई करू शकता. आजकाल पारंपरिक शेती न करता फळबागांच्या शेतीकडे अनेकजण वळताना दिसत आहेत.
एक झाड 100 ते 200 किलो फळे देते.
राजस्थानमध्ये बोराच्या झाडांची सर्वाधिक लागवड केली जाते. बोराच्या झाडाचे दोन जाती आहेत. एक छोटी बोरे आणि दुसरी सफरचंद बोरे. रामगडची बोरे जगभरात प्रसिद्ध आहेत. अनेकजण सध्या दोन्ही जातीच्या बोरांची लागवड करत आहेत.
छोट्या बोराच्या झाडापासून किमान 100 ते 150 किलो फळे मिळू शकतात. तर सफरचंद जातीच्या बोराच्या झाडापासून किमान 100 ते 200 किलो फळे मिळू शकतात. बोराचा हंगाम मे महिन्यापर्यंत असतो. बोरांमध्ये जास्त दिवस टिकण्याची क्षमता असते.
बोरांपासून बंपर उत्पन्न
बोरांच्या फळझाडांची लागवड करून तुम्ही चांगला कमाई करू शकता. बाजारात एक किलो बोरांची किंमत 120 रुपये प्रति किलोच्या आसपास असते. जर बाजारात आवक जास्त वाढली तर त्याची किंमत 80 रुपये प्रति किलोच्या आसपास येते. रामगढच्या बोरांना गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, जयपूर, उदयपूर, बिकानेर आणि इतर ठिकाणी नेहमीच जास्त मागणी असते.