अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra news :- केंद्र सरकार तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांचे, अल्पभूधारक शेतकऱ्यांची, व भूमिहीन शेतकऱ्यांचे (Landless) जीवनमान उंचवण्यासाठी कायमच वेगवेगळ्या योजना अमलात आणत असते.
महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) देखील राज्यातील शेतकऱ्यांसाठी व भूमिहीन शेतमजुरांसाठी (Landless agricultural laborers) अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत.
राज्य शासनाने नुकतेच भूमिहीन शेतमजुरांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना 2021 (Karmaveer Dadasaheb Gaikwad Swabhiman and Empowerment Scheme 2021) अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील (Scheduled Caste Category) शेतमजुरांना शेतजमीन विकत घेण्यासाठी (Subsidy To buy agricultural land) तब्बल 50 टक्के अनुदान दिले जाते, एवढेच नाही तर पन्नास टक्के बिनव्याजी कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाते.
या योजनेद्वारे भूमिहीन शेतमजुरांचे व अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जमीन कसण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या योजनेचा लाभ अनुसूचित जातीच्या भूमिहीन शेतमजुरांनाच दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत शासन शेतजमीन खरेदी करून ती संबंधित अनुसूचित जाती मधल्या भूमिहीन शेतमजूराच्या नावे करत असते.
दारिद्र रेषेखालील असलेल्या अनुसूचित जातीच्या भूमिहीन शेतमजूरास चार एकर कोरडवाहू शेती घेण्यासाठी तसेच दोन एकर बागायती शेती घेण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेअंतर्गत 50% बिनव्याजी कर्ज देऊन तसेच 50 टक्के अनुदान देऊन शेत जमीन उपलब्ध करून दिली जाते.
याचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही निकष देखील लावून दिले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने कमीत कमी वय 18 तर जास्तीत जास्त वय 60 वर्ष हे निश्चित केले आहे.
अर्ज करणाऱ्या भूमिहीन शेतमजूराच्या नावावर शेतजमीन नसावी. तसेच सदर अर्जदार हा दारिद्र्यरेषेखालील असावा. या योजनेअंतर्गत शेत जमीन घेण्यासाठी देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी असेल मात्र याची दहा वर्षाच्या आत परतफेड करणे आवश्यक आहे.
संबंधित लाभार्थ्यांना कर्ज दिल्यानंतर दोन वर्षांनी कर्जाची परतफेड सुरू होणार आहे. या समवेतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत शेत जमीन मिळवणाऱ्या लाभार्थ्याला स्वतः शेत जमीन कसणे अनिवार्य राहणार आहे, यासाठी एक बॉंड अथवा करारनामा देखील मायबाप शासन दरबारी सादर करावा लागतो.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना 2021 साठी आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर, अर्जदाराला पासपोर्ट फोटो,जातीचा दाखला तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र,रेशन कार्ड झेरॉक्स,आधार कार्ड झेरॉक्स,वोटर आयडी कार्ड,भूमिहीन असल्याचा दाखला,
उत्पन्नाचा दाखला,वय आणि अधिवास प्रमाणपत्र,शाळा सोडल्याचा दाखला,दारिद्र रेषेखालील असल्याबाबत पुरावा,शेतजमीन आवडली म्हणून शंभर रुपयांच्या स्टॅम्प वर प्रतिज्ञापत्र या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहायक आयुक्त किंवा समाजकल्याण कार्यालयात भेट द्यावी.