कृषी शास्त्रज्ञांचा मोठा शोध!! आता बासमती तांदळाची निर्यात कोई नहीं रोकेगा…..

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Krushi news:-निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस शेती पिकांवर रोगराईचे सावट वाढत आहे. पिकांवर रोगराई पसरली की त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांना (Farmer) नाना प्रकारच्या औषधांची फवारणी करावी लागते.

कीटकनाशकांचा अति वापर झाल्यामुळे अशा शेतपिकाची निर्यात करणे अशक्य बनत जाते. बासमती तांदळाच्या (Basmati Rice) बाबतीत देखील काहीसा असाच प्रकार घडला होता.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोणताही शेतमाल निर्यात करण्यासाठी तो एका विशिष्ट संस्थेकडून प्रमाणित केला जातो. प्रमाणित केलेला शेतमालाला मोठ्या प्रमाणात निर्यात केले जात असते.

मध्यंतरी मात्र बासमती तांदळावर रोगाचे सावट वाढत असल्याने शेतकरी बांधवांना कीटक नाशक (Pesticides) फवारण्याची नामुष्की ओढावली होती.

यामुळे बासमती तांदळाचे तयार झालेले उत्पादन निर्यात करण्यास अनेक अडचणी समोर येऊ लागल्या होत्या. मात्र आता रोगराईचे सावट आले म्हणून बासमती तांदळावर कीटकनाशक फवारणीची आवश्यकता नाही कारण की,

पुसा येथील भारतीय कृषी संशोधन समितीने बासमती तांदळाच्या एकूण तीन जाती विकसित (Three species developed Of Basmati Rice) केल्या आहेत.

विशेष म्हणजे या तिन्ही जाती रोग प्रतिरोधक आहेत. यामुळे या नव्याने विकसित केलेल्या जातीसाठी कीटक नाशक फवारणी याची गरजच राहणार नाही.

यामुळे या वाणापासून तयार होणारे उत्पादन रसायन मुक्त असेल आणि सध्या रसायनमुक्त मालाची मोठी मागणी आहे. यामुळे आगामी काही दिवसात बासमती तांदळाची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि साहजिकच त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.

मित्रांनो आम्ही सांगू इच्छितो की, पुसा येथील भारतीय कृषी संशोधन समितीने बासमती 1509 ते 1847 या वाणामध्ये सुधारणा केली आहे. याशिवाय 1121 ते 1885 व 1401 या वाणामध्ये सुधारणा केल्याचे सांगितले आहे आणि 1886 नावाचे नवीन वाण या संस्थेने विकसित केले आहे.

या वाणाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे नव्याने विकसित केलेले तिन्ही वाण रोगप्रतिबंधक आहेत. यामुळे या पिकासाठी कीटकनाशकाची गरज भासणार नाही असा दावा केला जात आहे.

या तीन वाणामध्ये प्रामुख्याने फुगीर व ब्लास्ट हे रोग होणार नाहीत. ब्लास्ट रोगामुळेच शेतकरी बांधवांना ट्रायसायक्लेझोल याचा वापर करावा लागला आणि यामुळे बासमती निर्यातीस अडचणी जाणवल्या होत्या.

भारतीय कृषी संशोधन समिती पुसा यांनी विकसित केलेल्या या नवीन वानांमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे व आता बासमती तांदळाची निर्यात कोणीच थांबवू शकत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe