‘या’ झाडाच्या शेतीपासून लाखो नाही तर करोडो मिळतात; एक झाड कमवून देते 6 लाख रुपये

Published on -

शेती परवडत नाही, असं म्हणणारे कित्येक शेतकरी असतात. त्याऊलट शेतीतून करोडपती झालेलेही अनेकजण सापडतात. गेल्या वर्षी अहिल्यानगर जिल्ह्यातील राजेंद्र रावसाहेब गाडेकर या शेतकऱ्याने चंदनाच्या शेतीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली होती. तब्बल 27 एकर शेतीत गाडेकर यांनी 14 हजार चंदनाची झाले जोपासली होती. चंदनाची शेती खरंच फायदेशीर आहे का? ती कशी करतात? किती फायदा होतो? हेच गणित आज आपण समजून घेऊ.

चंदनाला आहे मार्केट

पारंपरिक शेतीपेक्षा वेगळी आणि अधिक नफा देणारी ही शेती अल्प गुंतवणुकीत सुरू करता येते. काही वर्षांतच त्यातून कोट्यवधींची कमाई शक्य होते. विशेष म्हणजे, चंदन हे भारतात सर्वाधिक महागडं लाकूड मानलं जातं. सध्या बाजारात चंदनाच्या लाकडाचा दर प्रती किलो 26 हजार ते 30 हजार रुपये आहे. एका झाडापासून 15 ते 20 किलो चंदन मिळू शकतं. म्हणजेच एकाच झाडापासून 5 ते 6 लाख रुपयांचा नफा सहज मिळू शकतो.

पर्याय म्हणून लावा चंदन

अनेकदा शेतकरी पारंपारीक शेतीवर गुजराण करतात. परंतु आता चंदनची झाडे तुम्ही तुमच्या पारंपारिक शेतीमध्ये पर्यायी पीक म्हणूनही लावू शकता. तुम्ही जे पीक घेता ते घ्या, परंतु तुमच्या शेतीच्या बांधावर किंवा आंतरपिकातही चंदनाची झाडे लावता येतात. इतर पिकांसोबतही ही शेती शक्य आहे.

किती लागते पाणी?

इतर झाडांसारखी चंदनाच्या झाडाला पाण्याची गरज खूपच कमी असते. चंदनाच्या झाडांना जास्त पाण्याची गरज नसते. त्यामुळे कमी सिंचनाच्या भागांमध्येही ही शेती यशस्वी होऊ शकते. अनेकदा कोरडवाहू शेतकरीही चंदनाच्या शेतीचा प्रयोग करतात व यशस्वी होतात. अहिल्यानगर येथील राजेंद्र गाडेकर यांनीही माळरानावर 27 एकर चंदनाची शेती यशस्वी करुन दाखवली होती.

काय घ्यावी काळजी?

चंदन हे परजीवी झाड असल्यामुळे त्याच्यासोबत होस्ट प्लांट लावणं अत्यावश्यक आहे. झाडांच्या आजूबाजूला स्वच्छता राखणे फार महत्त्वाचे असते.

लागवडीसाठी योग्य वेळ कोणती?

चंदन लागवडसाठी कोणताही विशिष्ट हंगाम नसतो. पण रोपे २ ते अडीच वर्षांची असावीत, असे सांगितले जाते. चंदनाची शेती वर्षात कधीही करता येते. फक्त चंदनाची शेती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली किंवा पूर्वापार शेती करत असलेल्या शेतकऱ्यांना विचारून करावी. गाडेकर यांनी तामिळनाडूच्या मदुराई येथील 2017-18 मध्ये पांढऱ्या चंदनाची रोपे आणली होती.

किती असते रोपांची किंमत?

एक चंदनाचे रोप 100 ते 130 रुपये, आणि होस्ट प्लांट 50 ते 60 रुपये यामध्ये मिळतात. म्हणजेच चंदनाची झाडे फार महाग नसतात. शिवाय त्यांची विशेष काळजीही घ्यावी लागत नाही.

कधी सुरु होते कमाई?

परफ्यूम आणि सौंदर्यप्रसाधन उद्योगात मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधांमध्ये आणि धार्मिक व संस्कृतिक विधींमध्ये वापर केला जातो. चंदन लावल्यानंतर पहिल्या 8 वर्षांत त्याची काळजी द्यावी लागते. पण त्यानंतर झाड सुगंधी होऊ लागते आणि त्याची बाजारात मोठी मागणी निर्माण होते. याच कारणामुळे सुरक्षेची व्यवस्था करणे गरजेचे ठरते. सध्या सरकारने चंदनाच्या खाजगी खरेदी-विक्रीवर बंदी घातली असून, केवळ सरकारच चंदन खरेदी करते. त्यामुळे शेती करताना योग्य नोंदणी व अधिकृत प्रक्रियांचे पालन करणं गरजेचं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe