शेतकरी असाल तर ही बातमी वाचाच ! बाजार समिती राहणार बंद…

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील दि भाजीपाला फळफळावर अडत्यांची असोसिएशनने शनिवारी (दि. ४) बंदची हाक दिली आहे.

शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष सुनील विधाते, सचिव मोहन गायकवाड व नंदू बोरुडे यांनी दिली आहे.

शेतकरी पुत्रांच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रभर आंदोलन तीव्र होत असताना असोसिएशनने एक दिवसीय बंदचा निर्णय घेऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. शनिवारी भाजीपाला व कांदा विभागात कोणतेही व्यवहार होणार नसून कडकडीत बंद पाळला जाणार आहे.

या बंदमध्ये सहभागी होण्याचे आडत व्यापारी व शेतकरी वर्गाला असोसिएशनने आवाहन केले आहे. या बंद बाबतचे पत्र तालुका निबंधकांना देण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe