शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी गव्हासह ह्या ६ पिकांच्या हमीभावात वाढ

Published on -

Agricultural News : केंद्र सरकारने विपणन सत्र २०२४-२५ साठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) १५० रुपयांची वाढ करून ते प्रतिक्विंटल २,२७५ रुपये करण्याची घोषणा केली. प्रमुख गहू उत्पादक राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.

२०१४ साली केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने गव्हाच्या एमएसपीमध्ये केलेली ही सर्वांत मोठी वाढ आहे. गव्हासोबतच रब्बी हंगामातील हरभरा, जव, मसूर, रॅपसीड – मोहरीचे बी व करडईच्या एमएसपीत वाढ करण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला.

विपणन सत्र २०२३ २४ (एप्रिल-मार्च ) साठी गव्हाचा प्रतिक्विंटल एमएसपी २,१२५ आहे. गहू रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. ऑक्टोबरमध्ये गव्हाच्या पेरणीला सुरुवात होते. एप्रिल महिन्यात गव्हाची काढणी होते.

एमएसपी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून निश्चित केलेले किमान आधारभूत दर आहेत. या दरापेक्षा कमी भावात सरकारी संस्थांना धान्याची खरेदी करता येत नाही. मंत्रिमंडळाने २०२४-२५ या विपणन सत्रासाठी रब्बी हंगामातील प्रमुख सहा पिकांच्या एमएसपीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बैठकीनंतर माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

उत्पादन खर्च व किंमत आयोगाने (सीएसीपी) केलेल्या शिफारसीच्या आधारे रब्बी हंगामातील सहा पिकांच्या किमतीत वाढ केली आहे. गव्हाच्या एमएसपीमध्ये प्रतिक्विंटल १५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे २०२४-२५ विपणन सत्रात गव्हाला प्रतिक्विंटल २, २७५ रुपये किमान भाव मिळणार असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

मध्य प्रदेश व राजस्थान ही गहू उत्पादक राज्ये आहेत. या राज्यांतील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारने गव्हासोबतच रब्बी हंगामातील सहा प्रमुख पिकांच्या एमएसपीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी गव्हाच्या निर्यातीवर मे २०२२ पासून निर्बंध लागू आहेत. जवाच्या हमीभावात ११५ रुपयांची वाढ करून तो १८५० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. मसूरच्या एमएसपीत ४२५ वाढ केल्याने तो ६००० रुपये क्विंटल होईल. हरभऱ्याचा एमएसपी १०५ रुपयांनी वाढवून ५४४० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना केंद्र सरकारची दिवाळी भेट

गव्हाच्या एमएसपीमध्ये प्रतिक्विंटल १५० रुपयांची वाढ तर जवाच्या हमीभावात ११५ रुपयांची वाढ करून तो १८५० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. मसूरच्या एमएसपीत ४२५ वाढ केल्याने तो ६००० रुपये क्विंटल होईल. तसेच हरभऱ्याचा एमएसपी १०५ रुपयांनी वाढवून ५४४० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe