अवघ्या २४ महिन्यांत आंब्याच्या झाडांना लागली मोठ्या प्रमाणात फळे

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Agricultural News : शिर्डीलगतच्या सावळीविहीर परीसरातील प्रगतशील शेतकरी सुनील कुलकर्णी व संजय कुलकर्णी यांनी २० गुंठे जमिनीवर ५० आंबा झाडांची लागवड केली होती. अवघ्या २४ महिन्यांत या झाडांना मोठ्या प्रमाणावर कैऱ्याची फळे लागलेली दिसत आहे.

यात लंगडा, वनराज, केशर, राजापुरी जातीच्या गोड रसाळ व जास्त वजन असलेल्या व जास्त आयुष्यमान असलेल्या झाडाचा समावेश असून शेती व्यवसायात खात्रीशीर उत्पन्न यातून शेतकऱ्यांना मिळु शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याबाबत माहिती देताना कुलकर्णी म्हणाले, की २४ महिन्यात मोठ्या प्रमाणावर कैरीचे फळे लागलेली असून चवीला गोड आहे. या झाडाचे आयुष्यमान पाणी, खत, औषधे व देखभाल यावर उत्पन्न अवलंबून असते. त्या झाडांना शेणखत टाकण्यात आले आहे.

पाण्याचा निचरा होत असलेल्या जमिनीवर ही झाडे झपाट्याने मोठी होतात. एका कैरीचे वजन ७०० ग्रॅमच्या आसपास आहे. ही झाडे बघण्यासाठी अनेक शेतकरी या ठिकाणी भेट देत आहेत. कुलकर्णी कुंटबाने या परिसरात शेतीवर विविध प्रयोग करुन

नाविणपुर्ण शेती करत उत्पन्न घेऊन आदर्श निर्माण केला असून त्या कार्याबद्दल विविध पुरस्कार देऊन त्यांच्या कामाची दखल शासकीय यंत्रणेने घेतली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe