अहिल्यानगरच्या भाजीपाला बाजारात गवारीला १२ हजार तर शेवग्याला १० हजारांचा भाव, जाणून घ्या आजचे बाजारभाव?

Published on -

अहिल्यानगर- नगर बाजार समितीत शुक्रवारी विविध भाजीपाल्यांची २१९४ क्विंटल आवक झाली होती. टोमॅटोची ४३७ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये मेथी, पालक, शेपू, कोथिंबीरच्या २२ हजार ७१७ जुड्यांची आवक झाली होती. ५ ते १२ रुपयांपर्यंत भाव मिळाला. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल ४०० ते १८०० रुपये भाव मिळाला. वांग्यांची २१ क्विंटल आवक झाली होती.

वांग्यांना प्रतिक्विंटल ३००० ते ८००० रुपये भाव मिळाला. काकडीची १३० क्विंटल आवक झाली होती. काकडीला प्रतिक्विंटल ५०० ते ३००० रुपये भाव मिळाला. गवारीची ११ क्विंटल आवक झाली होती. गवारीला ६००० ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

फ्लॉवरची ३९ क्विंटल आवक झाली होती. फ्लॉवरला १५०० ते ५५०० रुपये भाव मिळाला. घोसाळ्याची ११ क्विंटल आवक झाली होती. घोसाळ्याला प्रतिक्विंटल २००० ते ६००० रुपये भाव मिळाला. दोडक्याची २३ क्विंटल आवक झाली होती. दोडक्याला २००० ते ८००० रुपये भाव मिळाला.

कारल्याची २२ क्विंटलवर आवक झाली होती. कारल्याला प्रतिक्विंटल २५०० ते ७५०० रुपये भाव मिळाला. कैरीची २ क्विंटलवर आवक झाली होती. कैरीला १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. भेंडीची ५६ क्विंटलवर आवक झाली होती. भेंडीला प्रतिक्विंटल २००० ते ६००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेवग्याला १० हजारांचा भाव

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी हिरव्या मिरचीची ६२ क्विंटलवर आवक झाली होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. लसणाची ३२ क्विंटल आवक झाली होती. लसणाला प्रतिक्विंटल ३००० ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवग्याची २७क्विंटलवर आवक झाली होती. शेवग्याला प्रतिक्विंटल ३००० ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. लिंबांची ४२ क्विंटल आवक झाली. लिंबाला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!