पालेभाज्यांची आवक जास्तच; लसूण, शेवगा महागला

Sushant Kulkarni
Published:

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर: मोठ्या प्रमाणावर पुन्हा थंडी सुरू झाली आहे. याचा परिणाम पालेभाज्यांवर झाला आहे.तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध असल्याने बाजारात पालेभाज्यांची आवक अद्यापही जास्त आहे.यामुळे पालेभाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर कमी झालेले आहेत.बाजारात शेवगा व लसून, हिरव्या मिरचीचेही भाव काहीसे वाढले आहेत.लसणाच्या भावात वाढ झालेली आहे.

शेवग्याचे बाजारभाव टिकून आहेत.मात्र, त्या तुलनेत इतर भाजीपाला स्वस्त झाला आहे.येथील बाजार समितीत मिळालेले दर पुढीलप्रमाणे : वांगी ५०० ते ३०००, टोमॅटो ४०० ते १५००, फ्लावर, ३०० ते १५००, कोबी ४०० ते १८००, काकडी ७०० ते३७००, गवार २००० ते १३०००, घोसाळे १००० ते ४०००, दोडका १५०० ते ५०००, कारले १००० ते ६०००, कैरी २००० ते १८००, भेंडी १५०० ते ५५०००, वाल १५०० ते ४०००, घेवडा ३००० ते ६०००, तांदुळे ३००० ते ६०००

डिंगरी ५०० ते २६००, बटाटे ५०० ते २६००, लसून १६००० ते ३००००, हिरवी मिरची २५०० ते ७०००, पकांडा ५००० ते ५०००, आवळा २००० ते ३०००, शेवगा ३००० ते ८०००, ढेमसे ३००० ते ४०००, लिंबू २००० ते ५५००, आद्रक २००० ते ३५००, गाजर २००० ते ३५००, दुधी भोपळा १००० ते २०००, मका कणसे १५०० ते १८००, शिमला मिरची १००० ते ३६००, मेथी ८०० ते २४००, कोथंबिर ६०० ते २१००, पालक ६०० ते १४००, करडई भाजी १२०० ते १८००

शेपू भाजी १००० ते १६००, पुदीना ३००० ते ३०००, चवळी २००० ते ३५००, बीट २००० ते ३०००, हरभरा १६०० ते २०००, वाटाणा २५०० ते ४५००, डांगर १००० ते १५०००, कांदापात १६०० ते १६००, बांलंटी ४००० ते ५०००. त्याच बरोबर मोसंबी १००० ते ४५००, संत्रा १००० ते ५०००, डाळींब २००० ते २२०००, पपई ५०० ते २०००, सिताफळ १००० ते ४५००, नारळ ३००० ते ३०००, अननस २१०० ते ५०००, चिकू २००० ते ४०००, द्राक्षे ४२०० ते ११०००, अॅपल बोर ५०० ते ३५००

सफरचंद ८००० ते १२५००, पेरू ८०० ते ३०००, कलिंगड ३०० ते ८००, खरबुज १००० ते ३०००, कडाळा १५०० ते ४०००, चमेली १२००, २५००, खिरणी २००० ते ९०००, केव्ही २००० ते २०००, गावराण बोरं १५०० ते ३०००, अॅपल बोरं १००० ते २०००, केळी १३०० ते २१००, स्टोबेरी २००० ते ३५०००, चेकनर ४००० ते ६०००, इगण ३००० ते १२००० आदी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe