अहिल्यानगर मध्ये कांद्याला मिळाला १९०० रुपयांचा भाव !

Published on -

Ahilyanagar News : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबजारात शनिवारी २६ हजार ९६३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. यावेळी लिलाव पद्धतीने झालेल्या एक नंबर गावरान कांद्याला प्रतिक्विंटल १९०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठ दिवसांच्या तुलनेत कांद्याच्या भावात शंभर रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले.

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये शनिवारी ४९ हजार २३ कांदा गोण्यांची आवक झाली होती. यावेळी लिलाव पद्धतीने झालेल्या कांद्याच्या खरेदीत व्यापाऱ्यांनी एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल किमान १६०० ते कमाल १९०० रुपये भाव दिला.

दोन नंबर कांद्याला किमान ११०० ते कमाल १६०० रुपये भाव मिळाला. तीन नंबर कांद्याला ६०० ते ११०० रुपयेभाव मिळाला. चार नंबर कांद्याना प्रतिक्विंटल २५० ते ६०० रुपये भाव मिळाला. दरम्यान, कांद्याच्या भावात शंभर रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले.

यापूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल १८०० रुपये भाव मिळाला होता. दरम्यान, बाजार समितीत कांद्याना कमीतकमी दर २५० रुपये, मध्यम प्रतिचा दर १२५० रुपये, तर जास्तीत जास्त दर १९०० रुपये मिळाला.

बाजार समितीत सुमारे २४५ ट्रक कांद्याची आवक झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला आहे. कांद्याच्या भावात वाढ होण्याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत.

६६ गोण्यांना मिळाला २१०० रुपयांचा भाव

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये ६६ गावरान कांद्याच्या गोण्यांना उच्च प्रतिचा प्रतिक्विंटल २१०० रुपये भाव मिळाला.२२३ कांदा गोण्यांना अपवादात्मक अधिकचा दर प्रतिक्विंटल २००० रुपये मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी दिली.

घोडेगाव उपबाजारात काद्यांना १८०० रुपयांचा भाव

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी ५४ हजार ५०६ कांदा गोण्यांची आवक झाली होती. यावेळी एकन नंबर उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल १७०० ते १८०० रुपये, दोन नंबर कांद्याला १४०० ते १५०० रुपये, तीन नंबर कांद्याला १२०० ते १३०० रुपये, गोल्टा कांद्याला ८०० ते १०० रुपये भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!