अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Krushi news :- कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून महिन्याभरापूर्वी दोन दिवसाला वाढणारे कांद्याचे दर एका रात्रीत हजारांच्या आत मध्ये येऊन पोहोचले आहेत.
बाजारातील कांद्यातील दारातील लहरीपणाचा अनुभव शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांना येतच असतो. महिन्याभरापूर्वी 3 हजार रुपये क्विंटलवर पोहचलेला कांदा आता थेट हजाराच्या आतमध्ये आला आहे.
तर कांदा नगरी लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कांदा बाजार आवारात कांद्याच्या बाजारात भावाची उतरण झाली आहे.
गेल्या आठवड्यातील शनिवारच्या तुलनेत बुधावारी लाल कांद्याच्या सर्वसाधारण बाजार भावात 425 रुपयांची प्रति क्विंटल मागे घसरण झाली आहे.
तर अजून उन्हाळी हंगामातील कांदा बाजारात येणे बाकी आहे. मागील दीड महिन्यापूर्वी आवक अधिकची असतानाही दर टिकून होते, कारण मागणीही त्याच प्रमाणात होती.
तर आता एकंदरीत मागणी कमी आवक जास्त याचा हा परिणाम आहे. तर राज्यातील पुणे, नाशिक, चाकण, सोलापूर,अहमदनगर या भागातही नवीन उन्हाळ कांद्याची आवक ही लाल कांद्याच्या बरोबरीने आवक येत असल्याने याचा थेट परिणाम दरावर होऊ लागला आहे.