सोयाबीन खरेदी केंद्र चालकाकडून लूट ? सरसकट तीन किलोची घट : आतिरिक्त १०० रुपये खर्च वसुली !

Sushant Kulkarni
Published:

७ जानेवारी २०२५ : आधीच हवामानाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली आहे.परत भाव देखील खूप पडले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. मात्र निसर्गाशी दोन हात करत पदरात पडलेले सोयाबीन शेतकरी विक्री करण्यासाठी खरेदी केंद्रावर घेऊन गेले असता तेथे देखील त्यांची लूट केली जात असल्याचे समोर आले आहे.

सध्या अनेक ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाली आहेत नगर तालुक्यातील दरेवाडी- नारायन डोह रोड वरती दरेवाडी हाद्दीत या ठिकाणी देखील सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे.मात्र या ठिकाणी विक्रीसाठी सोयाबीन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या मालात सरसकट एका क्विंटल मागे तीन किलो प्रमाणे घट कट करण्यात येत आहे.

तसेच साफ करण्याचे १०० रुपये खर्च म्हणून तो रोख वसूल करण्यात येत आहे. दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने माहिती घेण्यासाठी त्या केंद्र चालकाशी संपर्क साधला असता त्याच्याकडून माहिती न देता त्यानंतर शेतकऱ्यांना धारेवर धरत काही शेतकऱ्याचां माल परत पाठवून दिला.

आज पर्यंत सर्वकाही ठीक होते. मात्र आज काही शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी पत्रकारांनी चौकशी केली. या गोष्टीचा राग आल्याने शेतकऱ्यांची होत असलेली लूट माहीत पडू नये यासाठी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांचा माल परत पाठवला आहे. मात्र आजवर सर्वकाही ठीक चालले होते. कारण याबाबत कोणीच आवाज उठवला नव्हता. मात्र याबाबत वाच्यता होऊ नये यासाठी हा खटाटोप केला जात आहे.

यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. उत्पादनात घट, नंतर बाजारात सोयाबीनचे पडलेले भाव आणि आता सोयाबीन खरेदी केंद्र चालकाकडून होत असलेली लूट पाहता शेतकऱ्यांचा कोणी वाली आहे की नाही असेच म्हणावे लागत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe