महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ई-पीक पाहणीसाठी ‘या’ तारखेपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ

Published on -

Maharashtra Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सरकारने शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी साठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.  खरीप हंगाम 2025 साठी शेतकरी बांधव पीक पाहणी करत आहेत.

मात्र पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आतापर्यंत राज्यातील 81.04 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई पीक पाहणीद्वारे नोंद करण्यात आली आहे.

अर्थात एकूण लागवडी योग्य क्षेत्रापैकी 47.89% क्षेत्रावरील पीक पाहणी पूर्ण झाली आहे. सरकारला 14 सप्टेंबर पर्यंत कमीत कमी 60% क्षेत्रावरील पिकांची नोंद होईल अशी अपेक्षा होती. मात्र राज्य शासनाची ही अपेक्षा पूर्ण झाली आहे.

सर्वर डाऊन होण्याच्या समस्येने शेतकऱ्यांना पीक पाहणी करताना अडचणी येत होत्या. यामुळे शासनाकडे पीक पाहणी साठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आली.

यानुसार सरकारने सुरुवातीला 20 सप्टेंबर पर्यंत ईपीक पाहणी साठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला. दम्यान ही मुदत संपण्याआधीच पुन्हा एकदा राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाकडून आता शेतकऱ्यांना पीक पाहणी साठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पीक पाहणी पूर्ण केलेली नसेल त्यांच्यासाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त यांनी पिक पाहणी साठी मुदत वाढ मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत काल अर्थातच 18 सप्टेंबर रोजी एक महत्त्वाची बैठक झाली.

मुख्य सचिव यांच्यासोबत ही महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. याच बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून पीक पाहणी साठी मुदत वाढ देण्यात आली आहे.

कालच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकरी स्तरावरील पीक नोंदणी करण्यासाठी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ई पीक पाहणी अ‍ॅपद्वारे पिकांची नोंदणी करण्यासाठी अ‍ॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी साहाय्यक यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे.

दरम्यान पीक पाहणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने शेतकऱ्यांकडून शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe