Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक ! पीकविम्याच्या AIC कंपनीने महाराष्ट्रातील 16 कार्यालये केली बंद

Ajay Patil
Published:
pik vima nuksan bharpai

Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमागे संकटांची मालिकाच सुरू आहे. यावर्षी खरिपात निसर्गाच्या अवकृपेमुळे नुकसान झाले, पदरी खूपच कमी उत्पादन आले. शिवाय शेतमालाला बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात उत्पन्नाच्या नावावर दीड दमडी देखील आलेली नाही.

अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र आहे. आता दुष्काळात तेरावा महिना म्हणून प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या काम पाहणाऱ्या एआयसी कंपनीने महाराष्ट्रातील आपली एकूण 16 कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

16 जिल्ह्यातील आपली सर्वी कार्यालय कंपनी बंद करणार असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे. यामुळे साहजिकच आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांना सुलतानी संकटाचा सामना करावा लागणार आहे.

या कंपनीच्या मार्फत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपयांचे प्रीमियम भरण्यात आले आहे. खरं पाहता ही एक निमशासकीय कंपनी असून अनेक शेतकऱ्यांच्या विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांना केवळ अर्धी रक्कम मिळाली आहे.

अनेकांना तर पैसेच मिळालेले नाहीत. यामुळे आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. दरम्यान या संबंधीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर धावून गेलेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलने केली. कंपनीला पैसे का देत नाहीत याबाबत विचारणा केली. कंपनीवर दबाव बनवला. यानंतर कंपनीकडून काही शेतकऱ्यांना पैसे दिले गेले मात्र निम्मेच देण्यात आले.

शेतकऱ्यांनी एवढे आंदोलन केल्यानंतर, मागणी केल्यानंतरही या कंपनीने शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम दिलेली नसून बहुतांशी शेतकऱ्यांना एक छदाम देखील मिळालेला नाही. यामुळे संबंधित बाधित शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे संबंधित कंपनीची तक्रार केली.

जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या मार्गदर्शनातून आणि साह्याने संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळेच या कंपनीकडून महाराष्ट्रातील एकूण 16 जिल्ह्यातील आपली कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. निश्चितच यामुळे शेतकरी राजा भरडला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe