मुंबई : कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि उद्योग या मुद्द्यावर आधारित 2022-23 चा अर्थसंकल्प आज महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने विधानसभेत (Assembly) सादर केला. यासाठी येत्या तीन वर्षांकरिता चार लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा देणारी घोषणा केली आहे. विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातील (Marathwada) जिल्हे हे सोयाबीन आणि कापूस पिकाच्या नावाने ओळखले जाणारे आहेत.

त्यामुळे तेथील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि मूल्यसाखळी विकासासाठी येत्या ३ वर्षात १ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे.
दरम्यान, कापूस आणि सोयाबन पिकाचे केंद्र म्हणून विदर्भ आणि मराठवाडाची ओळख आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस व सोयाबीन पिकाची शेती केली जाते.
त्यामुळे येथील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या पिकांची उत्पादकात वाढवण्यासाठी आणि मुल्यसाखळी विकसीत करण्यासाठी येत्या ३ वर्षात १ हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.