कडू करल्याने आणली संसारात गोडी शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्याची कमाल; प्रतिवर्षी मिळतेय लाखोंचे उत्पन्न!

Published on -

अहिल्यानगर: ‘कडू कारले ते तुपात तळले अन साखरेत घोळले तरी ते कडूच’अशी आपल्याकडे म्हण प्रचलित आहे. मात्र याच कडू असलेल्या कारल्याने शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या संसारात गोडी आणली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून एक एकरावरील कारले लागवडीतून प्रतिवर्षी लाखो रूपये मिळविण्याची कमाल शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथील प्रगतशील शेतकरी वांढेकर करत आहेत. यामध्ये त्यांना पत्नी व इंजनिअर असलेला मुलगा देखील मुलगा करत आहे. यंदाही आतापर्यंत कारले पिकापासून सहा लाख रुपयांचे उत्पन्न अवघ्या तीन महिन्यांत मिळवले आहेत.

प्रगतशील शेतकरी वांढेकर यांची सामनगाव शिवारात १ हेक्टर ७८ आर शेती आहे. वांढेकर यांनी २८ एप्रिल रोजी शेतात कारल्याची लागवड केली. त्यांचा मुलगा हा सॉफ्टवेअर शाखेचा पदवीधर आहे. त्यालाही शेतीची आवड आहे. तोही शेतातील नवनवीन प्रयोगात आई-वडिलांना सहकार्य करतो. अगोदरही वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला, फळबाग यामध्ये त्यांनी यशस्वी प्रयोग केले. त्या प्रयोगाला चांगले यशही मिळाले.

कारल्याची शेती नेमकी कशी फुलविली माहितीत्यांनी आधी माहिती घेतली. वर्षातील दोन हंगाम लागवडीसाठी निवडले आहेत. एप्रिल अथवा नोव्हेंबर. अशा दोन महिन्यात लागवड केली जाते. दरवर्षी कारले लागवड करताना नवीन प्रयोग करतात. जसे दोन झाडांमधील अंतर बदलत राहतो. यातूनच असे समोर आले की जास्त अंतर असेल तर पीकही जोमदार येते, हाताळणीही सुलभ होते.

अचानक ढगाळ वातावरण झाले किंवा इतर काही बदल झाला तर आवश्यक फवारी तत्काळ केली जाते. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. खतेही नियमितपणे दिले जातात, असे त्यांनी सांगितले. आम्हाला जास्तीत जास्त ६० रूपये किलोपर्यंत भाव मिळाला आहे. मात्र, सरासरी २० रूपये किलो भाव मिळाला अन उत्पादन १८ ते २० टन झाले तरी पैसे मिळतात. त्यामुळे कमीत कमी जरी भाव मिळाला आणि उत्पादन चांगले मिळाले तर तोटा होत नअसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!