नवी दिल्ली : मान्सूनने (Mansoon) केरळमध्ये (Kerala) २९ मे रोजीच दणका दिला असला तरी देशाच्या इतर भागात मान्सूनचा कोणताही मागमूस नाही. या सगळ्या दरम्यान IMD ने एक आनंदाची बातमी दिली आहे.
आयएमडीने रॉयटर्स न्यूज एजन्सीला सांगितले आहे की, १५ जूनपासून देशाच्या मध्य आणि उत्तरेकडील मैदानी भागात मान्सूनचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
आयएमडीचे डीजी मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, आमच्या अंदाजानुसार १५ जूनपासून मान्सून वाढण्याची चिन्हे आहेत. हा पाऊस देशातील खरीप पिकांसाठी भात, मका, सोयाबीन, ऊस, भुईमूग आणि कापूस (Rice, maize, soybean, sugarcane, groundnut and cotton) या पिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
महापात्रा म्हणाले की, यावर्षी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आसाम, दक्षिण बंगाल, मेघालय, सिक्कीम आणि कर्नाटकच्या काही भागात मुसळधार पाऊस (Rain) आहे. ताज्या अंदाजानुसार, अरबी समुद्रावरील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पुढील पाच दिवस दक्षिण भारतीय द्वीपकल्पात पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
२७०० अब्ज डॉलरची कृषी अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून आहे
यंदा मान्सूनने आपल्या वेळेच्या दोन दिवस आधी २९ मे रोजी केरळमध्ये दस्तक दिली होती, मात्र २ जूनपर्यंत पाऊस ४२ टक्के कमी होता. IMD च्या मते, 50 वर्षांच्या सरासरीच्या आधारावर संपूर्ण हंगामात पाऊस ९६ते १०४ टक्के असेल तर तो सामान्य किंवा सरासरी पाऊस मानला जातो.
भारतात ७० टक्के पाऊस फक्त मान्सूनमध्ये पडतो. भारताची $2.7 ट्रिलियन ($2700 अब्ज) कृषी अर्थव्यवस्था या पावसावर अवलंबून आहे.