Monsoon Update: आला रे पाण्या….! राज्यात आजपासून पावसाची दमदार बॅटिंग, या जिल्ह्यांना अति-मुसळधार पावसाचा इशारा

Monsoon Update : राज्यात मान्सूनचे (Monsoon) आगमन खरं पाहता 10 जूनलाचं झाल्याचे भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) स्पष्ट केले होते. मात्र असे असले तरी मान्सूनच्या पावसासाठी (Monsoon News) पोषक वातावरण तयार होत नसल्याने जुनचा जवळपास पहिला पंधरवडा हा महाराष्ट्रातील जनतेला पावसाविना (Rain) काढावा लागला. मात्र आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले असून राज्यातील अनेक जिल्ह्यात आता मान्सूनच्या पावसाची (Monsoon Rain) दमदार हजेरी देखील बघायला मिळत आहे. त्यामुळे पावसाअभावी पेरणीसाठी खोळंबलेल्या शेतकऱ्यांना (Farmer) मोठा दिलासा मिळाला असून आता राज्यात पेरणीचे कामे जोर धरू लागले आहेत. असे असले तरी, अजूनही मान्सून स्थिर झाला नसल्याने शेतकरी बांधवांना हवामान विभागाने तसेच राज्याच्या कृषी विभागाने पेरणी करण्यासाठी घाई करू नये असा मोलाचा सल्ला देखील जारी केला आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज पासून सलग तीन दिवस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे. यामुळे निश्चितचं या विभागातील शेतकऱ्यांसाठी हे तीन दिवस आनंदाची पर्वणी ठरणारे आहेत. कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून तीन दिवस कधी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रासाठी भारतीय हवामान विभागाने 24 आणि 25 या दोन दिवसासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

राजधानी मुंबई तसेच मुंबई उपनगरात वरूणराजाने आगमन केले आहे. राजधानी व उपनगरात अधूनमधून पावसाच्या सऱ्या बरसत आहेत. यामुळे येथील वातावरण आल्हाददायक झाले असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे  यामुळे हैराण झालेल्या जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे. मुंबई व उपनगरात अजूनही अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याने मुंबई वासी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

मित्रांनो विदर्भात देखील मान्सूनच्या पावसाने दस्तक दिली असून यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यात नुकसान देखील झाले आहे. पावसामुळे सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात नुकसान झाल्याचे बघायला मिळाले. या मोसमी पावसामुळे ते जिल्ह्यातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. एकंदरीत अनेक दिवसापासून सुट्टीवर गेलेला मान्सून राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला असून आता अनेक ठिकाणी पेरणीला प्रत्यक्ष सुरुवात देखील झाली आहे. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांसमवेतच नागरिकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe