Monsoon Update: पंजाबरावांचा अंदाज आला रे…! आज राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार धो-धो पाऊस, वाचा सविस्तर 

Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Monsoon) उसंत घेतली आहे. राज्यातील अनेक भागात आता पावसाने (Monsoon News) विश्रांती घेतली असल्याने तापमानात मोठी वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या मते आज 30 जुलै रोजी राज्यातील विदर्भात विशेषता पूर्व विदर्भात विजेच्या गडगडाटासह पावसाची (Rain) शक्यता आहे.

तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस देखील कोसळणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. भारतीय हवामान विभागाने पूर्व विदर्भात काही जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या मते, विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेल्या परभणीचे भूमिपुत्र पंजाबराव डख यांनीदेखील 30 जुलैचा त्यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) सार्वजनिक केला आहे.

पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार (Panjab Dakh Weather Report), आज 30 जुलै रोजी राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात विशेषता कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यात सर्वदूर नाही मात्र तुरळक ठिकाणी मोठा पाऊस कोसळणार आहे.

पंजाबराव (Panjabrao Dakh) यांच्या मते, आज या जिल्ह्यात 20-30 मिनिट पाऊस पडेल मात्र पाऊस हा मोठा असेल. पश्चिम महाराष्ट्र व्यतिरिक्त राज्यातील लातूर, परभणी, धाराशिव, नांदेड, बीड या जिल्ह्यांत देखील सर्वदूर नाही मात्र तुरळक ठिकाणी पण मोठा पाऊस पडणार असल्याची शक्यता पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवली आहे.

पंजाबराव यांनी आपल्या नवीन सुधारित अंदाजात दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलै पासून ते तीन ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. तीन ऑगस्ट पर्यंत राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत शेतकरी बांधवांनी शेतीची कामे करून घ्यावीत असा सल्ला देखील पंजाब रावांनी दिला आहे.

कारण की 3 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा हवामानात मोठे बदल होणार असून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. 4 ऑगस्ट पासून ते 8 ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. निश्चितच 31 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत पावसाची उघडीप राहणार असल्याने शेतकरी बांधवांनी या कालावधीत आपली शेतीची कामे उरकवून घ्यावीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe