Onion News : केंद्र सरकारने निर्यात बंदी कायम ठेवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हजारो कोटीचे नुकसान होत आहे. असे मत शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी व्यक्त केले.
त्यांनी पुढे म्हट्ले आहे की, केंद्र सरकार फक्त ग्राहकांचा विचार करीत आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने आधिसूचना काढत ३१ मार्च २०२४ पर्यंत असलेली कांदा निर्यात बंदी पुढील आदेशापर्यंत कायम राहील असे जाहीर केले.
कांदा निर्यातबंदी कायम ठेवून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेपुसली आहेत. एक एकर कांदा उत्पांदन करण्यासाठी शेतकऱ्यांला सतर हजार रुपये खर्च येतो पंरतु निर्यात बंदीमुळे कांदा पीकास योग्य भाव मिळत नसल्याने
कांदा उत्पादकांनी केलेला खर्च देखील मिळत नाही. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी कायम ठेवून शेतकऱ्यांची निराशा केली आहे. कांदा निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असेही त्यांनी म्हट्ले आहे.