Agriculture News : कांदा रोपांना सोन्याचा भाव ! शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न

Ahmednagarlive24 office
Published:
Agriculture News

Agriculture News : राज्यात सध्या कांदा रोपांचे भाव गगनाला भिडले आहेत. चालू वर्षी पर्जन्यमान अल्प झाल्याने कांदा लागवडीसाठी रोपाची टंचाई शेतकऱ्यांना भासत असल्याने तयार रोपास प्रचंड मागणी असल्याचे दिसून येत आहे. त्यास सोन्याचे मोल प्राप्त झाले आहे.

शेतकऱ्यांना अल्पावधीतच नगदी पीक व नगद पैसा मिळवून देण्यासाठी कांदा लागवडीकडे कल असतो. कधी बाजारपेठेअभावी डोळ्यात पाणी तर कधी मनासारखे दर मिळाल्याने आनंदाश्रू अशी ओळख या पिकाची विशेषतः तयार झाली आहे.

चालू वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने शेतीचे नियोजन पूर्णपणे कोलमडून गेले. उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. केलेल्या खर्चही फिटला नाही. त्यात अधून-मधून बरसणाऱ्या जेमतेम पावसावर कांदा रोपे टाकण्याचे समीकरण शेवटपर्यंत जुळले नाही,

त्यामुळे पाणीच नसल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी कांदा रोप टाकण्यास पाठ फिरवली व वेळेला पाहू असा निर्णय घेतल्याने व पाणी टंचाईच्या कारणाने रोपे टाकलेत नाही.

त्यात थोड्याफार प्रमाणात कांद्याचे बाजारपेठ सुधारत असल्याने व लाल कांद्यास किमान चागला भाव आजमितीला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवडी कडे आपला मोर्चा सध्या वळवला आहे.

अनेक ठिकाणी लागवडीही चालू झाल्या आहेत; मात्र लागवडीसाठी योग्य रोपाची टंचाई जाणवत असल्याने रोप उपलब्ध झालेल्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

त्यामुळे भविष्यात कांद्याचा भाव गुलदस्त्यातच असला तरी, आज मात्र या रोपांना चागली मागणी व दर मिळत असल्याने बहुतेक शेतकरी सुखावला आहे. त्यात आता अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काही शेतकऱ्यांना तो तारक तर काहींना मारक ठरल्याने, रोप लागवडीसाठी मागणीत चढ-उतार होऊ शकत असल्याचा अंदाज जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आजमितीस किमान १६ ते १८ हजार रुपये पायलीच्या मागे पुढे दर आहेत. वाहतुकीचे अंतर जास्त असल्यास खर्च आणखी वाढतो. कांदा लागवडीसाठी कमीतकमी एकरी ४० ते ५० हजार रुपये येणारा खर्च लक्षात घेता, केंद्र व राज्य शासनाने यांची दर निश्चित धोरणात बदल करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.- संभाजी तनपुरे, प्रगतशील शेतकरी

चालू वर्षी पाऊस नसल्याने खरीप हंगाम वायागेला. रब्बीच्या आशाही धूसर झाल्या आहेत. जेमतेम पाणी शिल्लक असल्याने किमान कांदा पिकांतून उत्पन्न मिळून वार्षिक शेतीचा आर्थिक समतोल राखण्यासाठी मदत होणार असल्याने, शेतकऱ्यांची संपूर्ण मदार आता कांदा पिकावर आहे.

मुळातच कांदा नाशवंत असल्याने चांगल्या रोपांची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी वेळेवर हवामानानुसार फवारणी, पाणी, रासायनिक खतांची मात्रा यांची विशेष काळजी घेत रोपाची गुणवत्ता ठिकवून ठेवावी लागते. रोपांचा दर्जा व्यवस्थित असल्यास भविष्यात मागणी वाढल्यास दर २२ ते २५ हजारपर्यंत जाऊ शकतात.

मुळातच रोप कमी होते. त्यात मागील आठवड्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा कहर झाला. परिणामी काही कांदारोप खराब है ब झाले तर, त्या पावसामुळे बहुतेक शेतक-यांना पाण्याचा दिलासा मिळल्याने तयार रोपाची मागणी वाढली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe