अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये शनिवारी २६ हजार १५३ क्विंटल गावरान लाल कांद्याची आवक झाली होती. शनिवारी झालेल्या लिलावात एक नंबर गावरान कांद्याला प्रतिक्विंटल १३०० ते १७५० रुपये भाव मिळाला.
अहिल्यानगर बाजार समितीत दोन नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ९०० ते १३०० रुपये भाव मिळाला. तीन नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ५०० ते ९०० रुपये भाव मिळाला. चार नंबर कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ५०० रुपये बाजारभाव मिळाला.

दरम्यान अपवादात्मक भाव म्हणून ४८ कांदा गोण्यांना उच्च प्रतिचा १९०० रुपये भाव मिळाला. २३६ कांदा गोण्यांना उच्च प्रतिचा १८०० रुपये भाव मिळाला आहे.
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी ६९ हजार ८५९ कांदा गोण्यांची आवक झाली होती. यावेळी एक नंबर उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल १६०० ते १७०० रुपये, दोन नंबर कांद्याला १४०० ते १५०० रुपये, तीन नंबर कांद्याला १२०० ते १३०० रुपये भाव मिळाला. गोल्टा कांद्याला प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये भाव मिळाला