……मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘ही’ मागणी केंद्र सरकारने मान्य केली तर कांद्याला मिळणार चांगला दर! वाचा सविस्तर

Published on -

Onion Rate : गत काही वर्षांपासून राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. एक तर शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील अशाच अडचणीचा सामना करावा लागतो.

कांदा हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. पण कांदा बाजारातील लहरीपणा शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरतोय. यामुळे पिकासाठी आलेला खर्च सुद्धा शेतकऱ्यांना भरून काढता येत नसल्याची वास्तविकता आहे.

पण आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. त्यांनी केंद्राकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक मोठी मागणी उपस्थित केली आहे.

बाजारात कांद्याचे दर टिकून राहावे व त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. यासाठी केंद्रातील सरकारने कांदा निर्यात अनुदान दुप्पट करावे अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री महोदयांनी केंद्राकडे केली आहे.

मंत्रालयात पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत कांद्याच्या बाजार भावा संदर्भात महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पण मंत्री जयकुमार रावल यांनी स्वतः ही माहिती दिली.

मंत्री रावल यांनी सरकार कांदा उत्पादकांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही देतानाच उत्पादन वाढले असल्याने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देणे व इतर उपाययोजना आवश्यक असल्याचे नमूद केले.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्राकडे कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची मागणी केली आहे.  महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रातील मोदी सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रस्तावावर सकारात्मकता दाखवली आहे.

यामुळे लवकरच सरकार कांदा निर्यात अनुदान वाढवण्याची घोषणा करू शकते आणि यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. निर्यातीसाठी अनुदान मिळाले तर विविध देशांमध्ये कांदा निर्यात होईल आणि देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर स्थिर राहतील.

बाजारात सातत्याने अफवा पसरवल्या जातात आणि कांद्याचे दर पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. पण आता यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात दक्षता समिती कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या समितीच्या माध्यमातून साठेबाजी तसेच नफेखोरी सारख्या गोष्टींवर लक्ष राहणार आहे. नफेखोरी करण्याच्या उद्देशाने अफवा पसरवणाऱ्या लोकांवर बाजार समितीने स्थानिक पातळीवर कडक कारवाई करावी अशा सूचना देखील यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News