PM Kisan 16 Installment : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. त्यामधील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या योजनेपैकी एक आहे. शेतकऱ्यांना या योजनेतून आर्थिक लाभ दिला जात आहे.
2019 मध्ये केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 15 हफ्ते जमा करण्यात आले आहेत. आता आज शेतकऱ्यांच्या खात्यात 16 वा हप्ता जमा केला जाणार आहे. देशातील करोडो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यावेळी ते महिला बचत गटाच्या महिलांना संबोधित करणार आहे. तसेच मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 व्या हफ्त्याचे 2,000 रुपये जमा करणार आहे.
केंद्र सरकारकडून एका वर्षात कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये दिले जात आहेत. हे पैसे समान तीन हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. प्रत्येक हफ्त्यामध्ये 2,000 रुपये जमा केले जातात. सीबीडीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारकडून ही रक्कम जमा केली जाते.
या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही
केंद्र सरकारकडून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजेनचा लाभ दिला जात आहे. मात्र आता ज्या शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि जमीन पडताळणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात 16 व्या हफ्त्याचे पैसे जमा केले जाणार नाहीत.
खात्यावर आलेले पैसे कसे तपासायचे
तुम्हालाही तुमच्या खात्यावर आलेले पीएम किसान योजनेचे पैसे तपासायचे असतील ते काम तुम्ही घरबसल्या करू शकता.
सर्वात प्रथम तुम्हाला https://pmkisan.gov.in/ या पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
आता तुम्ही यामधून Beneficiary Status पर्याय निवडा.
त्यानंतर तुम्ही मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका.
कॅप्चा कोड भरून ओटीपी पाठवा.
मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी भरा.
त्यानंतर तुम्हाला तुमचा खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही ते समजेल.