Pm Kisan : बातमी कामाची! पुन्हा मोबाईल द्वारे ई-केवायसी सुरू; आधार आधारित ओटीपी पासून ई-केवायसी प्रक्रिया बहाल

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Pm Kisan :- Pm Kisan Sanman Nidhi Yojna 2022 : पीएम किसान ही शेतकरी हिताची एक महत्वाची योजना आहे. ही योजना देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी (Prime Minister Hon’ble Narendra Modi) यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे.

या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर येतं आहे. आता या योजनेसाठी ई-केवायसी (E-KYC) करणे हेतू आधार सेवा केंद्रांमध्ये जाण्याची बिल्कुल गरज नाही.

जर लाभार्थीचा मोबाईल नंबर त्याच्या आधारशी लिंक असेल, तर त्या संबंधित लाभार्थ्याला त्याच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून ओटीपीद्वारे घरी बसून ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी पीएम किसान (Pm Kisan) पोर्टलवर आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले होते, जे की आता पुन्हा नव्याने सुरू करण्यात आले आहे. याशिवाय बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी तुम्ही जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधू शकता.

आपल्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, देशातील सुमारे 12.50 कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. पीएम किसानचे कोट्यावधी लाभार्थी पुढील अर्थात 11व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

असे असले तरी, जर योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही तर शक्यता आहे की त्यांचा 2000 रुपयांचा हप्ता लटकू शकतो.

पीएम किसान पोर्टलवर आधार आधारित ई-केवायसी पुन्हा सुरू करण्यात आली आहे आणि त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी पी एम किसान योजनेसाठी केवायसी केली नसेल त्यांनी त्यांच्या मोबाइलचा किंवा लॅपटॉपचा वापर करून ई-केवायसी करणे अति महत्त्वाचे आहे.

विशेष म्हणजे यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. त्यामुळे पुढचा हप्ता योजनेच्या लाभार्थ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय प्राप्त करायचा असेल तर 31 मे पर्यंत केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.

ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया

»यासाठी, प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या ब्राउझरमध्ये जा आणि तेथे https://pmkisan.gov.in/ टाइप करा. आता तुम्हाला पीएम किसान पोर्टलचे मुख्यपृष्ठ मिळेल, त्याच्या तळाशी जा आणि तुम्हाला ई-केवायसी लिहिलेले दिसेल. त्यावर टॅप करा आणि तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर टॅप करा.

»आता त्यात आधारशी लिंक असलेला आपला वयक्तिक मोबाईल नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर 4 अंकी OTP येईल. तिथे प्रदान केलेल्या बॉक्समध्ये तो टाइप करा.

»यानंतर, तुम्हाला पुन्हा एकदा आधार प्रमाणीकरणासाठी टॅप करण्यास सांगितले जाईल. त्यावर टॅप करा आणि आता तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आणखी 6 अंकी OTP येईल. तो भरा आणि सबमिट वर टॅप करा.

»जर सर्व काही ठीक झाले तर eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid असे दिसेल. असे झाल्यास तुमचा हप्ता उशीर होऊ शकतो. यामुळे invalid अर्थात अवैध झालं तर आपण सेवा केंद्रावर जाऊन केवायसी करून घेऊ शकता. जर तुमचे eKYC आधीच पूर्ण झाले असेल तर eKYC आधीच पूर्ण झाले आहे असा संदेश दिसेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशात आतापर्यंत 12 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe