PM Kisan Yojana: सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ज्या काही विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्या योजनांमध्ये केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्थात पीएम किसान योजना ही एक महत्त्वाकांक्षी आणि अतिशय यशस्वी झालेली योजना म्हणून सध्या ओळखली जाते.
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ तीन टप्प्यात विभागून देण्यात येतो. आतापर्यंत जवळपास या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 19 हप्ते वितरित करण्यात आले आहेत व या योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता व याचा लाभ जवळपास 9.8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना झाला.

लवकरच शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसानचा 20 वा हप्ता
साधारणपणे पीएम किसान योजनेच्या हप्त्यांचे जर वितरण पाहिले तर सतरावा हप्ता हा जून 2024, अठरावा हप्ता ऑक्टोबर 2024 आणि 19 वा हफ्ता हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
म्हणजेच वार्षिक शेतकऱ्यांना देण्यात येणारी सहा हजार रुपयांची रक्कम ही दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली.
त्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होईल अशी एक शक्यता असून जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित होईल अशी एक अपेक्षा आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून मात्र याबाबतची कुठलीही अधिकृत तारीख मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
पीएम किसानचा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही कसे तपासाल?
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जे काही हप्ते वितरीत करण्यात येतात त्याचा लाभ किंवा त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले की नाही हे जर तुम्हाला तपासायचे असेल तर त्याकरिता पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्हाला तुमच्या हप्त्यांची स्थिती तपासता येऊ शकते.
याकरिता तुम्हाला तुमचे बँक खाते आणि आधार कार्डची माहिती अपडेट ठेवावी लागते. जेणेकरून मिळणाऱ्या हप्त्यामध्ये किंवा पेमेंटमध्ये तुम्हाला विलंब होणार नाही. तुमचे सर्व कागदपत्रे बरोबर असतील व तुम्ही जर पात्र शेतकरी असाल तर जून 2025 मध्ये येणारा विसावा हप्ता तुम्हाला नक्कीच मिळेल.