अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शनिवारी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विविध फळांची २७० क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
सफरचंदाची आडीच क्विंटलवर आवक झाली होती. सफरचंदाला प्रतिक्विंटल १० हजार ते २४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी डाळिंबांची ५६ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

मोसंबीची ३ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते ५ हजार रुपये भाव मिळाला. बदाम आंब्याची ५ क्विंटलवर आवक झाली होती. बदाम आंब्यांना प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये भाव मिळाला. तोतापुरी आंब्यांची ५६ क्विंटल आवक झाली. तोतापुरीला प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये भाव मिळाला आहे