Ahilyanagar News: अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी २३०२ क्विंटल विविध भाजीपाल्याची आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ६२५ क्विंटल बटाट्याची, तर ४५० क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. यावेळी बटाट्याला प्रतिक्विंटल १५०० ते २४०० रुपये, तर टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते १७०० रुपये भाव मिळाला. वांगे, दोडके व कारल्याला प्रतिक्विंटल ८ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
३३ क्विंटल वांग्यांची आवक
अहिल्यानगर बाजार समितीत मंगळवारी वांग्यांची ३३ क्विंटल आवक झाली होती. वांग्यांना प्रतिक्विंटल २००० ते ८००० रुपये भाव मिळाला. काकडीची १५० क्विंटल आवक झाली होती. काकडीला प्रतिक्विंटल ५०० ते २५०० रुपये भाव मिळाला. गवारीची १३ क्विंटल आवक झाली होती. गवारीला ५००० ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. फ्लॉवरची ९७क्विंटल आवक झाली होती. फ्लॉवरला १००० ते ४५०० रुपये भाव मिळाला.

कोबीला ५०० ते २००० रुपये भाव
कोबीची १४५ क्विंटल आवक झाली होती. कोबीला ५०० ते २००० रुपये भाव मिळाला. घोसाळ्याची २ क्विंटल आवक झाली होती. घोसाळ्याला प्रतिक्विंटल २५०० ते ५५०० रुपये भाव मिळाला. दोडक्याची साडेसहा क्विंटल आवक झाली होती. दोडक्याला २००० ते ८००० रुपये भाव मिळाला. कारल्याची २५ क्विंटलवर आवक झाली होती. कारल्याला प्रतिक्विंटल २००० ते ८००० रुपये भाव मिळाला. कैरीची ३० क्विंटलवर आवक झाली होती. कैरीला १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. भेंडीची ३८ क्विंटलवर आवक झाली होती. भेंडीला प्रतिक्विंटल २००० ते ५५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
वालाला प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये भाव
वालाची १ क्विंटल आवक झाली होती. वालाला प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये भाव मिळाला. घेवड्याची २ क्विंटल आवक झाली होती. घेवड्याला प्रतिक्विंटल १० हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. तांदुळ्याची १ क्विंटलवर आवक झाली होती. तांदुळ्याला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये भाव मिळाला.
कोथिंबिरीच्या जुडीला ५ ते १२ रुपयांपर्यंत भाव
मंगळवारी पालेभाजांच्या २९ हजार ८५५ जुड्यांची आवक झाली होती. यामध्ये मेथीच्या ९२५० जुड्यांची आवक झाली होती. मेथी जुडीला ५ ते १५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. कोथिंबिरीच्या १६ हजार २७५ जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीच्या जुडीला ५ ते १२ रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेपूच्या ३१५० जुड्यांची आवक झाली होती. यावेळी शेपू भाजीच्या जुडीला ५ ते १५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. पालकच्या ४५० जुड्यांची आवक झाली होती. पालक भाजीच्या जुडीला १० रुपये भाव मिळाला.
शेवग्याच्या शेंगांना मिळाला १० हजार रुपयांपर्यंत भाव
अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी हिरव्या मिरचीची ७० क्विंटलवर आवक झाली होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल २००० ते ३७०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. लसणाची ३६ क्विंटल आवक झाली होती. लसणाला प्रतिक्विंटल ३००० ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवग्याची ३३ क्विंटलवर आवक झाली होती. शेवग्याला प्रतिक्विंटल ५००० ते ९००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. लिंबांची ३७ क्विंटल आवक झाली. लिंबाला प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
भुईमुगाच्या शेंगांना ४५०० रुपयांपर्यंत भाव
अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी २८० क्विंटल भुईमुगाच्या शेंगांची आवक झाली होती. भुईमुगाच्या शेंगांना प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये भाव मिळाला. आद्रकची ५५ क्विंटल आवक झाली होती. आद्रकला प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये भाव मिळाला. गजाराची २१ क्विंटल आवक झाली होती. गाजराला १००० ते २५०० रुपये भाव मिळाला. दुधी भोपळ्याची ३५ क्विंटल आवक झाली होती. दुधी भोपळ्याला प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये भाव मिळाला.