वाढत्या तापमानाचा फटका पपई पिकावर; काय आहेत कृषी तज्ञांचे सल्ले..! जाणून घ्या सविस्तर…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi news :- ह्या वर्षी निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर सध्या वाढत्या तापमानाचा पपई उत्पादनावर परिणाम दिसू लागला आहे.

गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर आता त्यात आणखी वाढत्या तापमानाची भर पडली आहे.

तर वाढत्या तापमानामुळे आंबा, द्राक्ष आणि पपई उत्पादक शेतकऱ्यांना पुढे वाढत्या तापमानाची नवीनच समस्या उभी राहिली आहे.वाढत्या तापमानामुळे खानदेशमधील पपईच्या बागा रोगराईच्या झपाट्यात सापडत आहेत.

यामुळे पपई पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावट दिसू लागले आसून पानगळ होत आहे. त्यामुळे पपई उत्पादक शेतकरी काळजीत पडला आहे.

पपई उत्पादक शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणामुळे उत्पादनात घट होईल की काय अशी शंका भेडसावू लागली आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंतचे नोंदविले जात आहे.

वाढत्या तापमानामुळे पपईच्या बागा रोगराईच्या झपाट्यात सापडत असून तापमानामुळे पपईची पानगळ होऊ लागली आहे.त्याच बरोबर वाढत्या तापमानामुळे पपईची फळे देखील पिवळी पडू लागली आहेत.

तर निसर्गामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पपईच्या बागा जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. तर ज्या बागा नुकसानीपासून वाचल्या आहेत.

अशा शेतकरी बांधवांकडे बागेचे संरक्षण हाच पर्याय उरला आसून अशा बागेवर आच्छादन घालणे हा एक पर्याय उरला असून त्यासाठी झाडावर गोणपाटचा वापर आच्छादनासाठी केला जाऊ शकतो.असे कृषी वैज्ञानिक सांगत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe