Farming Business Idea: मोतीची शेती सुरु करा आणि कमी वेळेतच कमवा लाखों; वाचा पर्ल फार्मिंगची संपूर्ण माहिती

Ahmednagarlive24 office
Published:

Farming Business Idea : बाजारपेठेत मोत्यांच्या उत्कृष्ट मागणीमुळे हा भारतातील सर्वोत्तम शेतीपूरक व्यवसायांपैकी एक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा मोत्यांच्या शेतीचा व्यवसाय (Pearl Farming) नेमकं कोण सुरू करू शकतो?

तर मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की ज्यांना आपला वेळ शेती व शेतीपूरक व्यवसायात (Agri Business) खर्च करायचा आहे आणि कमी काळात चांगला नफा कमवायचा आहे त्यांच्यासाठी हा एक सर्वोत्तम व्यवसाय आहे.

स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेत मोत्यांना मोठी मागणी आहे. तुम्ही इतर मत्स्यपालन किंवा शेतीपूरक व्यवसायासोबत मोत्यांची शेती करू शकता. आदर्श पर्ल फार्मिंग पद्धतींतर्गत, व्यावसायिक मोत्यांची शेती उत्तम उत्पन्न देऊ शकते असा दावा केला जातो.

पर्ल फार्मिंग सुरु करण्यासाठी सर्वात अनुकूल हंगाम जर कुठला असेल तर तो आहे शरद ऋतू. शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्याचा कालावधी पर्ल फार्मिंगसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा केला जातो.

पर्ल फार्मिंग हा व्यवसाय किमान 10 x 10 फूट किंवा त्याहून मोठ्या तलावात करता येतो. मोत्यांच्या शेतीसाठी, 0.4 हेक्टरसारख्या लहान तलावात जास्तीत जास्त 25000 ऑयस्टरपासून मोती तयार करता येतात. मोत्यांची शेती सुरू करण्यासाठी तलाव, नद्या इत्यादींमधून शिंपले गोळा करावे लागतात किंवा ते बाजारातूनही विकत घेता येतात.

अशी करा मोत्याची शेती
पर्ल फार्मिंग व्यवसायाच्या सुरूवातीस, प्रत्येक लहान ऑपरेशननंतर, प्रत्येक ऑयस्टरमध्ये 4 ते 6 मिमी व्यासाचे साधे किंवा डिझाइन केलेले मणी जसे की गणेश, बुद्ध, फुलांच्या आकृत्या इत्यादी घातल्या जातात.

मग शिंपले बंद केले जातात आणि हे ऑयस्टर किंवा शिंपले नायलॉनच्या पिशव्यामध्ये 10 दिवस प्रतिजैविक आणि नैसर्गिक आहारावर ठेवले जातात. त्यांची दररोज तपासणी केली जाते आणि मृत शिंपले बाजूला काढले जातात.

आता हे शिंपले तलावात टाकले जातात. यासाठी त्यांना बांबू किंवा बाटल्यांचा वापर करून नायलॉनच्या पिशव्यांमध्ये (दोन ऑयस्टर) टांगून एक मीटर खोलीवर तलावात सोडले जाते.

मोत्यांच्या शेतीमध्ये 20 हजार ते 30 हजार ऑयस्टर प्रति हेक्टर या दराने त्यांचे संगोपन करता येते. आतून येणारे साहित्य मणीभोवती स्थिरावू लागते जे शेवटी मोत्याचे रूप घेते. सुमारे 8-10 महिन्यांनंतर, ऑयस्टर कापला जातो आणि मोती बाहेर काढला जातो.

मोती शेतीपासून कमाई किती
पर्ल फार्मिंग हा असा व्यवसाय आहे जो तुम्हाला इतर लोकांपासून वेगळेपण देत असतो. हा व्यवसाय फक्त तेच लोक करू शकतात ज्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. मित्रांनो एक एकर पारंपारिक शेतीतून जर 50 हजार रुपये कमवली जाऊ शकतात तर मोत्यांच्या शेतीतून 8-10 लाखांचा नफा कमवला जाऊ शकतो.


तलावातील बहुउद्देशीय योजनांचा लाभ घेऊन 8-10 प्रकारचे व्यवसाय करून आणखी उत्पन्नात वाढ केली जाऊ शकते.

या फायदेशीर व्यवसायात (Profitable Pearl Farming Business) महिला वर्ग आला तर जास्त नफा मिळू शकतो.

पर्ल फार्मिंगसाठी खर्च
एका ऑयस्टरची किंमत सुमारे 20 ते 30 रुपये एवढी असते. बाजारात 1 मिमी ते 20 मिमी ऑयस्टर पर्लची किंमत सुमारे 300 ते 1500 रुपये आहे. आजकाल डिझायनर मोत्यांना खूप पसंती दिली जात आहे, ज्यांना बाजारात चांगली किंमत मिळते.

पर्ल फार्मिंग बिझनेसमध्ये, भारतीय बाजाराच्या तुलनेत परदेशी बाजारपेठेत मोती निर्यात करून खूप चांगले पैसे कमावता येतात. शिंपल्यापासून मोती काढल्यानंतर ऑयस्टरही बाजारात विकता येतात. शिंपल्यापासून अनेक सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात.

कनौजमध्ये ऑयस्टरपासून सुगंधी तेल काढण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यामुळे स्थानिक बाजारातही शिंपले लगेच विकता येतील. या व्यवसायात नद्या आणि तलावांचे पाणीही शिंपल्यांनी शुद्ध केले जाते. त्यामुळे जलप्रदूषणाची समस्या बऱ्याच अंशी आटोक्यात येऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe