Successful Farmer: मित्रांनो देशातील शेतकरी बांधव आता काळाच्या ओघात अल्पकालावधीत काढणीसाठी येणाऱ्या तसेच बाजारपेठेत बारामाही मागणी असणाऱ्या पिकांची (Cash Crops) शेती करू लागले आहेत.
आता शेतकरी बांधव (Farmers) नवनवीन औषधी वनस्पतींची (Medicinal Plant Farming) तसेच फुल शेती करू लागले आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा फायदा होत आहे.
राजस्थान मधील एका शेतकऱ्याने देखील फुलशेतीच्या (Floriculture) माध्यमातून चांगली प्रगती साधली असून फुल शेतीने या अवलिया शेतकऱ्याला आर्थिक सुबत्ता मिळवून दिली आहे.
राजस्थान मधील जयपूर जिल्ह्यातील जैतपुरा भुरथल येथील शेतकरी रामवतार सैनी गेल्या 15 वर्षांपासून झेंडुच्या फुलांची शेती (Marigold Flower Farming) करत आहेत.
झेंडूच्या अनेक जातींची (Marigold Variety) हा शेतकरी लागवड करत असतो, ज्यामध्ये गुलदावरी (Guldavari Marigold Variety) ही झेंडूची जातं सर्वात महाग विकल्या जाणाऱ्या फुलांपैकी एक आहे.
फुलशेतीत त्यांना कमी खर्चात व कमी कष्टात जास्त नफा मिळत आहे. झेंडु फुलशेतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भटकी जनावरे याला खात नाहीत आणि शिवाय रोगराई देखील या फुलावर कमी येते.
यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होते शिवाय उत्पन्नात भरीव वाढ होते.झाडाला चार दिवसांतून एकदा पाणी द्यावेया अवलिया शेतकऱ्याने झेंडूच्या पिकासाठी पाणी व्यवस्थापन करणे हेतू ठिबक सिंचन प्रणालीचा यशस्वी वापर केला.
ठिबक सिंचन प्रणालीमुळे झेंडूच्या फुल पिकाला पाणी कमी वापरले जाते. झेंडूच्या झाडाला चार दिवसातून एकदाच पाणी लागत असल्याचे रामवतार सांगतात.
लागवडीनंतर 50 दिवसांनी फुले येतातप्रयोगशील शेतकरी रामावतार यांनी सांगितले की, झेंडूची रोप लावल्यानंतर 50 दिवसांत फुलायला सुरुवात होते.
फुले तोडल्यानंतर इतर ठिकाणी जमीन तयार करून पुन्हा झेंडूची रोपटे लावले जातात. तोपर्यंत लावलेली रोपटी फुलू लागतात. शेताची नांगरणी केल्यानंतर त्यात ठिबकचे पाईप टाकले जातात, त्यानंतर झेंडूची रोपटे लावले जाते.
झेंडूच्या फुलांची लागवड जवळपास वर्षभर सुरू असते. गुलदावरी जातीला जास्त मागणीसैनी सांगतात की, हजारा, कलकत्ता हजारा, हायब्रीड यलो, ऑरेंज या सर्व जाती वर्षभर चालतात. गुलदावरी वर्षातून दोनदा येते, त्याची मागणी दिल्ली, सुरत, मुंबई, अहमदाबाद, जयपूरसह अनेक ठिकाणी आहे.