अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Agricluture News :- गेल्या दोन वर्षात सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी आता उन्हाळी सोयाबीन पेरणीला ही जोर दिल्याचे चित्र दिसत आहे.
तर लागवडीखालील क्षेत्र ही वाढत आहे. यावर्षी अकोला जिल्ह्यातील सोयाबीन ला पुन्हा झळाली आली असून सोयाबीन ला प्रतिक्विंटल आठ हजार रुपये भाव मिळत आहे.

यावर्षी येत्या खरीपात ही पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्याचे सरासरी खरीप क्षेत्र 2 लाख 18 हजार 886 असून त्यापैकी 86 ते 95 टक्के क्षेत्रावर दशकापूर्वी पेरणी होत होती.
मात्र , गेल्या काही वर्षापासून पेरणी क्षेत्र वाढत आहे. तर खरीप 2021 मध्ये 100% म्हणजे सरासरी पेक्षाही अधिक 2 लाख 18 हजार 906 हेक्टरवर पेरणी झाली आहे.
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरिपासोबतच उन्हाळी सोयाबीन घेण्याकडे पाऊल टाकले असून, बहुतांश भागात हा प्रयोग यशस्वी झाल्याचेही चित्र आहे.
सोयाबीनला बाजारात मिळत असलेल्या योग्य भावामुळे सोयाबीन उत्पादकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. सोयाबीन गेल्या दोन वर्षात चांगला भाव मिळत आसल्याने सोयाबीन पेरणी क्षेत्र ही वाढत आहे.
गेल्या हंगामात सोयाबीनला उच्चांकी दर दहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळत होता.मात्र यावर्षी सोयाबीनचे भाव पुन्हा वधारले आहे. हमीभावापेक्षा ही कमी म्हणजे प्रति क्विंटल दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे.
त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. अकोला जिल्ह्यासह विदर्भातील खरिपातील मुख्य पीक म्हणून सोयाबीन ची ओळख आहे.
तर दहा हजारावर पोहोचलेले सोयाबीन चे दर गेल्या काही दिवसापासून वधारून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल 7 हजार 200 रुपये भाव मिळत आहे.
सद्यस्थिती पाहता उत्पादन खर्च वाढत गेला असून बाजारात रास्त भाव मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादकांना नुकसान सोसावे लागत आहे.