या’ फळाने खाल्ला भाव: किलोला मिळतोय चक्क ‘इतका’ दर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  सध्या बाजारात शेतमालाची आवक चांगलीच वाढली असून भाजीपाल्यासह फळांना देखील मागणी वाढल्याने भाव देखील चांगले मिळत आहेत. या मोसम मध्ये डाळिंब ,संत्री ,मोसंबी,केळी आदी फळांची आवक होत आहे.

मात्र यावेळी वातावरण बदलाने अनेक दुष्परिणाम झाल्याने डाळिंब बागाचे क्षेत्र कमी झाल्याने डाळिंबाची आवक घटल्याने डाळिंबाला चांगला भाव मिळत आहे.

आपल्याकडे सफरचंद म्हणजे महागडे व श्रीमंत लोकांचे फळ असा समज आहे . मात्र हा समाज आता मोडीत निघाला आहे. कारण सध्या सफरचंदापेक्षा डाळिंबाला अधिक भाव मिळत आहे. मागील काही कालावधीत वातावरणात कमालीचे बदल झाले आहेत व होत आहेत.

मात्र या बदलामुळे मानवी जीवनावर अनेक विपरित परिणाम होत आहेत. सर्वात जास्त परिणाम शेतकऱ्यांवर झाले आहेत. एकतर मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीने हातात आलेले सर्व पिके नष्ट झाली.

यात मोठी हानी झाली असतानाच आता परत एकदा वातावरण बदलत असल्याने शेतात उभी असलेली पिके रोगांची शिकार झाली आहेत. त्यामुळे हि पिके वाचण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक महागडी औषधी फवारावी लागत आहेत.

परिणामी शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.मात्र खर्चाच्या तुलनेत उत्पादन खूप कमी निघत असल्याने झालेला खर्च देखील हातात नाही.

या सर्व घडामोडीत मात्र उत्पादन कमी झाल्याने आता डाळिंबाने चांगलीच उंच भरारी घेतली आहे. मंगळवारी येथील बाजार समितीत डाळिंबाला उच्चांकी १४० रुपये प्रति किलो इतका भाव मिळाला. त्या तुलनेत सफरचंदाला देखील कमी दर मिळत आहे.

आज फळांना मिळालेले दर (सर्व दर ): मोसंबी १००० – ६०००, संत्रा ५०० – २५००, डाळिंब १००० – १५०००, अननस २०० – ४००, चिकू ५०० – २०००, द्राक्षे २००० – ५०००, सफरचंद ७००० – १२००० असे दर मिळत आहेत .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe