अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात गुरुवारी ३१३ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यामध्ये डाळिंबाची ४८ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १००० ते १७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची ३९ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते ४५०० रुपये भाव मिळाला.
अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात गुरुवारी संत्र्यांची ५ क्विंटल आवक झाली होती. यावेळी संत्र्याला प्रतिक्विंटल १००० ते ५५०० रुपये भाव मिळाला. पपईची ३३ क्विंटल आवक झाली होती. पपईला १००० ते २५०० रुपये भाव मिळाला. अननसाची ३ क्विंटल आवक झाली होती. अननसाला प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रूटची ४८ क्विंटल आवक झाली होती.

ड्रॅगन फ्रूटला २००० ते ६००० रुपये भाव मिळाला. सफरचंदाची ४ क्विंटल आवक झाली होती. सफरचंदाला प्रतिक्विंटल १० हजार ते २३ हजार रुपये भाव मिळाला. बदाम आंब्यांची दीड क्विंटल आवक झाली होती. बदाम आंब्यांना प्रतिक्विंटल ३५०० रुपये भाव मिळाला.
तोतापुरी आंब्याची ८५ क्विंटलवर आवक झाली होती. तोतापुरी आंब्यांना १५०० ते २७०० रुपये भाव मिळाला. दशेरी आंब्याची सव्वाक्विंटल आवक झाली होती. दशेरी आंब्यांना प्रतिक्विंटल ५००० रुपये भाव मिळाला. जांभाची साडेचार क्विंटलवर आवक झाली होती. जांभळाला प्रतिक्विंटल ४००० ते ७००० रुपये भाव मिळाला. केळीची १४ क्विंटलवर आवक झाली होती.
केळीला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये भाव मिळाला. फणसाची ३ क्विंटलवर आवक झाली होती. फणसाला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये भाव मिळाला.