शेतकऱ्याने मागवले तुर्कस्तानवरून बाजरीचे बियाणे! बाजरी पिकाला आली चक्क 3 फुटाची कणसे, वाचा या बियाण्याचे वैशिष्ट्य

Ajay Patil
Published:

जागतिक आणि देशांतर्गत पातळीवर जर कृषी क्षेत्राचा विचार केला तर फार मोठ्या प्रमाणावर प्रत्येक बाबीत प्रमाणावर विकास झाला असून तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध पिकांच्या दर्जेदार वानांचा विकास यामुळे शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळणे शक्य झाले आहे. मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रामध्ये संशोधन झाल्याने आता आधुनिक तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे व शेती तंत्र मोठ्या प्रमाणावर सुधारित झाल्याने कृषी क्षेत्राला आता खूप चांगल्या पद्धतीचे दिवस येताना दिसून येत आहे.

तसेच आताचे शेतकरी देखील खूप हायटेक झाले असून  शेतीत अनेक प्रकारचे तंत्रज्ञानाचा वापर करून खूप मोठा फायदा मिळताना दिसून येत आहेत. यामध्ये पिकांच्या भरघोस उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर खत आणि पाणी व्यवस्थापन तसेच कीड व्यवस्थापनासोबतच पिकाच्या दर्जेदार वाणाची निवड खूप महत्त्वपूर्ण ठरते. कारण पिकांचे वाण दर्जेदार असेल तर त्यापासून मिळणारे उत्पादन देखील भरघोस असे मिळते.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची या गावच्या श्रीकांत फाकडे या शेतकऱ्याचा विचार केला तर त्यांनी चक्क तुर्कस्तान वरून ऑनलाईन पद्धतीने बाजरीचे बियाणे मागवले व त्याची लागवड केली. आता या बाजरीचे एक कणीस अडीच ते तीन फूट लांबीचे आहे. याविषयी आपण या लेखात माहिती घेणार आहोत.

 बाजार पिकाला आली चक्क तीन फुटाची कणसे

याबाबत सविस्तर वृत्त असे की,कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची शेतकरी श्रीकांत फाकडे यांच्या शेतातील बाजरीला चक्क तीन फुट उंचीची कणसे आली असून या माध्यमातून भरघोस उत्पादन मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे. त्यांच्याकडे कोरडवाहू शेती असून या शेतीमध्ये त्यांनी बाजरी लागवड करण्याचा निर्णय घेतला. या बाजरी लागवडीकरिता त्यांनी तुर्कस्थान येथून प्रतिकिलो पंधराशे रुपये या दराने बाजरीची बियाणे ऑनलाईन मागवून घेतले व एका एकरसाठी एक किलो याप्रमाणे त्यांनी एक एकर क्षेत्रामध्ये बाजरीची लागवड केली.

बाजरीची बियाण्याची लागवड करताना त्यांनी दोन फुटावर एक बी अशा पद्धतीने लागवड केली. सध्या बाजरीची लागवड करून दोन महिने पूर्ण झालेले आहे.आता बाजरी पिकाच्या ताटाची उंची आठ फूट तर त्याला आलेल्या कणसाची उंची ही अडीच ते तीन फुटांपर्यंत आहे. तीन महिने पूर्ण झाल्यानंतर बाजरी पीक काढणीस तयार होणार आहे. उच्च प्रतीचे हे बियाणे असल्यामुळे तसेच बाजरीच्या कणसाची उंची जास्त असल्यामुळे बाजरीचे भरघोस उत्पादन मिळेल अशी शक्यता आहे.

जर आपण तुर्कस्तानमधील या बाजरीच्या बियाण्याचा विचार केला तर गेल्या एक-दोन वर्षापासून महाराष्ट्रातील अनेक शेतकरी हे बियाणे ऑनलाईन पद्धतीने मागवत आहेत. विशेष म्हणजे सामान्य बाजरीची ज्या पद्धतीने आपण मशागत करतो अगदी त्याच पद्धतीने देखील या बाजरीचे व्यवस्थापन करावे लागते. पस्तीस ते पन्नास क्विंटल बाजरीचे उत्पादन मिळते असा देखील दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe