शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत सरसकट कर्जमाफीची घोषणा करा !

Published on -

देशाच्या सीमांवर जवान शहीद होत आहेत, पर्यटक मृत्युमुखो पडत आहेत आणि त्याचवेळी राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिताजनक वेगाने वाढत आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी रोज बळी पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने शुक्रवारी शिर्डीत बैलगाडी आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी तीव्र शब्दात राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. “तुमचं कर्ज माफ होऊ शकतं, पण शेतकऱ्यांचं का नाही? शेतकऱ्यांना आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांनी जर माणुसकी शिल्लक ठेवली असेल तर त्यांनी तात्काळ माफी मागावी आणि राजीनामा द्यावा.”

गायकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यांचा निषेध केला. शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न केले, तरी त्यांना माफी मिळत नाही, पण उद्योगपतींच्या हजारो कोटींच्या कर्जाला माफी मिळते, हे दुहेरी धोरण असह्य आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की, शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी.

जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन राज्याच्या प्रत्येक जिल्हा, तालुका व गावपातळीवर सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी करण गायकर, विजय वाहुळे, सुभाष गायकर, नवनाथ शिंदे, डॉ. किरण डोके, आशिष हिरे, अहिल्यानगर जिल्हा प्रमुख अविनाश शिंदे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीप राऊत, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस विठ्ठल भुजाडे, वैभव दळवी,

अमोल शिंदे, दत्ता महाराज पवार, दादासाहेब जोगदंड, शिवम शिंदे, आकाश गाडे, संदीप वाघ, संदीप गुंजाळ, अनिल मलदोडे, नितीन अनारसे, सुशांत कुंडदे, शिवाजीराजे चौधरी, जालिंदर असणे, तुषार गोंदकर, राहुल शिंदे, राहुल दुसाने, निमदेव हिरे तसेच छावा क्रांतिवीर सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News