Unseasonal Rain:- यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम तर पूर्णपणे वाया गेलाच आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्याचा विपरीत परिणाम खरीप हंगामातील प्रमुख पिकांवर झाला व उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता असताना शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी करून उपलब्ध पाण्यामध्ये पिकांचे नियोजन केलेले होते. त्यातच दुसरे म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये द्राक्ष बागा आणि ऊस आणि काढणीला आलेला लाल कांदा शेतामध्ये होता व अशा अवस्थेत परवा व काल राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये गारपिट आणि अवकाळी पाऊस झाला व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
अनेक ठिकाणी द्राक्ष बागांचे नुकसान झाले तर उसाचे पीक देखील आडवे झाले. काढणीला आलेला कांदा खराब होण्याची शक्यता असून भाजीपाला पिके देखील जमीनदोस्त झाले. म्हणजेच शेतकऱ्यांचे उरलेसुरले स्वप्न देखील गारपिटीने हिरावून नेले. यामध्ये आता बऱ्याच शेतकरी बंधूंनी पिकांचा किंवा फळ पिकांचा विमा काढला असेल तर आता शेतकरी बंधूंना या गारपिटीमुळे आणि अवकाळी मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवण्याकरिता विमा मिळणे आवश्यक आहे
व त्यासंबंधीची तक्रार ऑनलाइन पद्धतीने करणे देखील महत्त्वाचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नुकसान झाल्यापासून 72 तासांच्या आतमध्ये ही तक्रार नोंदवणे गरजेचे आहे. तक्रार नोंदवली गेली नाही तर भरपाई मिळणार नाही त्यामुळे शेतकरी बंधूंनी या गोष्टीची खूप काळजी घेणे गरजेचे आहे.
ऑनलाइन पद्धतीने नोंदवा तुमची विम्याची तक्रार
नुकसान झाल्याच्या 72 तासाच्या आत ऑनलाईन पद्धतीने विमा तक्रार नोंदवणे गरजेचे असून ती ऑनलाईन पद्धतीने नोंदवायची आहे व त्याकरिता तुम्हाला….
1- तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स नावाचे ॲप डाऊनलोड करणे गरजेचे आहे.
2- ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जी भाषा योग्य वाटेल तिची निवड करावी.
3- या ठिकाणी तुम्हाला चार पर्याय दिसतील व त्यापैकी तीन नंबरचा पर्याय नोंदणी खात्याशिवाय खाते सुरू ठेवा हा पर्याय निवडणे गरजेचे आहे.
4- त्यानंतर पाच प्रकारचे पर्याय तुमच्या समोर येतील.
5- या पाच पर्यायांपैकी तुम्हाला पीक नुकसान हा पर्याय निवडायचा आहे.
6- पिक नुकसान हा पर्याय निवडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि पीक नुकसानीची सध्याची स्थिती असे दोन पर्याय यामध्ये दिसतील.
7- त्या ठिकाणी तुम्हाला पीक नुकसानीची पूर्वसूचना हा पर्याय निवडायचा आहे.
8- त्यानंतर तुम्ही पिक विमा भरताना जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकावा.
9- त्यानंतर जो ओटीपी येईल तो ओटीपी टाकून सबमिट करावे.
10- त्यानंतर हंगाम, वर्ष, योजना आणि राज्य अशी माहिती भरायची आहे.
11- त्यानंतर नोंदणीचा स्त्रोत या कॉलममध्ये आपण विमाचा फॉर्म कुठून भरला त्याची माहिती भरणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ सीएससी सेंटर, ऑनलाइन पद्धतीने मोबाईलच्या माध्यमातून इत्यादी
12- तसेच तुमच्या विमा फॉर्म वरील पॉलिसी क्रमांक टाकावा.
13- त्यानंतर तुम्ही भरलेल्या विम्याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसते.
14- त्यानंतर तुम्ही विम्यामध्ये दाखल केलेल्या पिकांपैकी कोणत्या पिकाचे नुकसान झाले आहे त्याची निवड करावी.
15- पिकाची निवड केल्यानंतर फोनवरील लोकेशनचे ॲक्सेस ऍपला देणे गरजेचे आहे.
16- त्यानंतर तपशिलामध्ये घटनेचा प्रकार, नुकसान झाल्याचा दिनांक तसेच घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा, नुकसान भरपाईचे संभाव्य टक्केवारी तसेच फोटो, व्हिडिओ इत्यादी माहिती नमूद करायची आहे.
17- त्यानंतर सबमिट करा म्हणजे सादर करा या बटणावर क्लिक करावे.
18- त्यानंतर तुम्हाला डॉकिट आयडी(Docket ID) नंबर येईल तो व्यवस्थित जपून ठेवावा. कारण या नंबर वरूनच तुम्हाला तुमच्या विम्याच्या तक्रारीची सद्यस्थिती म्हणजे स्टेटस तपासता येते.
टीप– सदर नुकसानीची तक्रार ही नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत करणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही तर नुकसान भरपाई मधून शेतकऱ्यांना उघडण्यात येते. यासोबत महत्त्वाचे म्हणजे नुकसानीची माहिती गावातील तलाठ्याला देणे आवश्यक आहे.