Pm Kisan Yojana Update: महाराष्ट्रातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 22.40 लाखाची घट! काय आहे त्या मागील कारण?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana Update:- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात. आतापर्यंत या योजनेचे 15 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आलेले असून शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची योजना आहे.

परंतु मागील काही दिवसांपूर्वी अनेक अपात्र लाभार्थ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यामुळे सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये अनेक बदल केले. जर देशांमध्ये या योजनेचे एकूण लाभार्थी पाहिले तर ते 1.08 कोटींपेक्षा जास्त असून लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी सरकारकडून 6000 रुपये देण्यात येतात.

परंतु सध्या या योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांची संख्या घटून 85.60 लाखांवर आलेली आहे. यामध्ये जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर चार वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये २२.४० लाखाने घट आलेली आहे.

 लाभार्थ्यांच्या संख्या घटण्यामागे ही आहेत कारणे

पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थ्यांची संख्या कमी होण्यामागे बरीच कारणे असून त्यातील काही कारणांचा शोध घेतला तर त्याच्या बऱ्याच लाभार्थ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही किंवा केवायसी सारख्या इतर निकषांमध्ये लाभार्थी अपात्र झाल्यामुळे या योजनेचा लाभ मिळणे त्यांना बंद झालेले आहे व त्यांची संख्या कमी झाली.

यामध्ये सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला होता की ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना किंवा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

परंतु असे असून देखील अनेक लाभार्थी शेतकऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्यामुळे अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणे बंद झाले. महाराष्ट्राचा विचार केला तर 2020-21 मध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 1.08 कोटी होती. 2022-23 मध्ये ती 1.04 कोटींवर आली. जुलै 2023 चा विचार केला तर ही संख्या 85.40 लाखांवर आलेली होती.

 पीएम किसान योजनेचे लाभार्थी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात जास्त आहेत?

पीएम किसान योजनेचे जर लाभार्थी पाहिले तर ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक असून त्यांची संख्या 5.17 लाख आहे. त्या खालोखाल सोलापूर 4.54 लाख, कोल्हापूर ४.६ लाख, बीड व पुणे 3.89, नागपूर 1.50 लाख, नासिक 3.85 लाख, छत्रपती संभाजी नगर 3.26 लाख आणि यवतमाळ 2.77 अशा पद्धतीने आहे.

 पीएम किसान योजनेमध्ये नवीन नोंदणी करत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या

तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु नोंदणी करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण नोंदणी करताना जर काही चुका झाल्या तर त्यामुळे या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकत नाही.

त्यामध्ये उदाहरण घेतले तर बँकेचे खाते क्रमांक, नाव, पत्ता, फोन नंबर यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नसावी. तुमच्या आधार कार्ड मध्ये जे नाव लिहिले आहे तेच नाव बँक खात्यात देखील असणे गरजेचे आहे. नावामध्ये थोडी जरी चूक झाली किंवा स्पेलिंग मिस्टेक झाली तरी देखील या योजनेचा हप्ता अडकू शकतो.

 नवीन नोंदणी करण्यासाठी ही कागदपत्रे लागतात

नवीन नोंदणी करिता तुमच्याकडे बँक खाते क्रमांक असणे गरजेचे आहे. कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्याद्वारे शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले जातात. बँक खाते हे आधारशी लिंक करणे देखील आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड असणे देखील गरजेचे असून त्याशिवाय तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाही.

तसेच नवीन नोंदणी करताना पीएम किसानचे संकेतस्थळ  pmkisan.gov.in यावर तुम्हाला कागदपत्र अपलोड करणे गरजेचे आहे. आधार लिंक करण्याकरिता तुम्ही या संकेतस्थळाच्या फार्मर कॉर्नर या पर्यायावर जाऊ शकतात व त्या ठिकाणी आधार तपशील संपादित करा या पर्यायावर क्लिक करून ते अपडेट करू शकतात.

महत्वाचे म्हणजे आता या योजनेच्या नोंदणी करता रेशन कार्ड देखील आवश्यक करण्यात आले. त्यामुळे तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर लगेच रेशन कार्ड बनवा व पी एम किसान पोर्टल वर त्या रेशन कार्डचा क्रमांक टाकणे आता आवश्यक झाले आहे. जर तुम्ही नोंदणीच्या वेळी शिधापत्रिका क्रमांक दिलेला नसेल तर ते काम पटकन पूर्ण करणे गरजेचे आहे.

तसेच तुम्हालाही केवायसी करणे देखील गरजेचे आहे. या अगोदर तुम्हाला खात्याचे विवरणपत्र, आधार कार्ड तसेच बँक पासबुक आणि घोषणापत्र इत्यादीच्या हार्ड कॉपी जमा करणे गरजेचे होते. परंतु आता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे व त्याऐवजी आता फक्त सॉफ्ट कॉपी जमा करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा वेळ वाचतो.