Post Office Scheme : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात कुठे गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास करणार आहे. अलीकडे, गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. पोस्ट ऑफिस, एलआयसी अशा विविध ठिकाणी गुंतवणूक केली जात आहे. याशिवाय बँकेच्या FD योजनेत देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे.
दरम्यान आज आपण अशा एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये दररोज 417 रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 40 लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही या योजनेत महिन्याला साडेबारा हजार रुपये गुंतवून लखपती होऊ शकणार आहात.
कोणती आहे ती योजना ?
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा पीपीपी योजना ही गुंतवणूकदारांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना एक सरकारी बचत योजना आहे.
या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 7.1% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे. विशेष म्हणजे या योजनेत कंपाऊंडिंग तत्वावर व्याज दिले जात आहे. अर्थातचं चक्रवाढ व्याज लागू होणार आहे.
पीपीएफ योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात गुंतवणूकदारांना आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत करसवलतीचा देखील लाभ मिळतो. या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट देखील मिळतं असते.
तसेच यातून मिळणाऱ्या व्याजावर देखील कर लागत नाही. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर पोस्टात या योजनेसाठी खाते ओपन करू शकता. बँकेमध्ये देखील पीपीएफ योजनेसाठी खाते ओपन करता येते.
417 रुपयांची गुंतवणूक 15 वर्षात बनणार 40 लाखांची
या योजनेत जर तुम्ही महिन्याला 12500 गुंतवलेत म्हणजेच दररोज 417 रुपये वाचवलेत अन ही गुंतवणूक पंधरा वर्षांसाठी केली तर तुम्हाला 15 वर्षांनी तब्बल 40 लाख 68 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे.
यातील 22 लाख 50 हजार रुपये ही तुमची स्वतःची गुंतवणूक राहणार आहे आणि उर्वरित रक्कम म्हणजेच 18 लाख 18 हजार रुपये हे व्याज राहणार आहे. मात्र व्याजदरात बदल झाला तर या रकमेत देखील बदल होणार आहे.