बजाज ऑटो ही कंपनी वाहन निर्मिती क्षेत्रातील एक आग्रगण्य कंपनी असून या कंपनीने आतापर्यंत अनेक बाईक लॉन्च केलेले आहेत. भारतातील प्रत्येक ग्राहकांमध्ये बजाजच्या बाईक प्रसिद्ध आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर बजाजची पल्सर ही अगदी शेतकऱ्यांपासून तर कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील प्रसिद्ध आहे.
यावरून आपल्याला बजाजच्या दुचाकींची लोकप्रियता समजून घेता येते. अगदी याच पद्धतीने आता बजाज ऑटोने दुचाकी निर्मिती क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य पाऊल उचलले असून बजाज ऑटो च्या माध्यमातून 18 जून 2024 रोजी जगातील पहिली सीएनजी इंधनावर चालणारी बाईक लाँच केली जाणार आहे.
यासंबंधीची माहिती बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत दिली. या बाईक विषयी माहिती देताना त्यांनी म्हटले की, जगातील पहिली सीएनजी वर चालणारी मोटरसायकल पुढच्या महिन्यात येत आहे व ही बाईक पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकच्या तुलनेत निम्म्या किमतीत असेल.
या बाईकचे नाव असू शकते ब्रूझर 125 सीएनजी
याबाबत माहिती देताना त्यांनी म्हटले की, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर ही बाईक लोकांसाठी खूप महत्त्वाचे ठरेल. तसेच ही बाईक वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये लॉन्च केली जाणार आहे.
महत्वाचे म्हणजे ही बाईक सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात आणि नंतर ज्या राज्यांमध्ये सीएनजी स्टेशन उपलब्ध आहे अशा राज्यांमध्ये सुरू केली जाणार आहे. जर आपण काही मीडिया रिपोर्टनुसार बघितले तर या सीएनजी रन बाईकचे नाव ब्रूझर 125 सीएनजी असण्याची शक्यता आहे.
या सीएनजी बाईकमुळे प्रदूषण कमी होईल
या नवीन प्रकल्पाबाबत राजीव बजाज यांनी म्हटले की, या बाईकच्याप्रोटोटाईपच्या चाचणी दरम्यान कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जनामध्ये 50 टक्क्यांची आणि कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जनामध्ये 75% आणि गैरमिथेन हायड्रोकार्बन उत्सर्जनामध्ये सुमारे 90% ची घट झाली. याचाच अर्थ पेट्रोल बाईकच्या तुलनेत हे उत्सर्जनाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले व याचाच अर्थ या सीएनजी बाइकने प्रदूषण देखील कमी होईल.
बजाजची नवीन चेतक इलेक्ट्रिक स्कूटर या महिन्यात येणार
बजाजच्या माध्यमातून या महिन्यात नवीन चेतक इलेक्ट्रिक स्कूटर देखील लाँच केली जाणार आहे व बजाज ऑटो दरवर्षी किमान एक नवी स्कूटर लॉन्च करेल अशी देखील माहिती देण्यात आली. तसेच बजाज ऑटोच्या माध्यमातून काही थ्री व्हीलर सेगमेंटमध्ये नवीन उत्पादने देखील पाहायला मिळतील अशी माहिती समोर आलेली आहे.
थ्री व्हीलर सेगमेंट चा विचार केला तर बजाज ऑटोचा बाजारातील हिस्सा जवळपास 80% च्या आसपास आहे. त्यासोबतच कंपनी आता ई रिक्षा मार्केटमध्ये देखील प्रवेश करण्याचा विचार करत असून यामध्ये अजून पर्यंत कोणतेही उत्पादन नाही.