Ahmednagar Breaking : विश्वस्तांच्या खोटया सह्या करत बँकेत कर्ज प्रकरण, नगरच्या डॉक्टरांनी बनावट कागदपत्रांद्वारे केली साडेआठ कोटींची फसवणूक

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Breaking :  बनावट कागदपत्र तयार करून बँकेच्या कर्ज प्रकरणात ते कागदपत्रे खरे आहेत असे भासविले. विश्वस्त मंडळात कोणताही ठराव नसताना बँकेत उघडलेल्या दोन्ही खात्यांचे सर्व अधिकार स्वतःकडे घेऊन बँकेच्या कर्ज प्रकारणासाठी जामीनदार करून फसवणूक केली.

बँकेतील ८ कोटी ५० लाखांच्या कर्जप्रकरणाला संस्थेला जामीनदार करण्यास विश्वस्थांचा विरोध असतानाही विश्वस्थांच्या खोटया सह्या करत आणि खोटी कागदपत्रे तयार करून बँकेत कर्जप्रकरण केल्या प्रकरणी नगरमधील दोघा डॉक्टरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अमित रसिकलाल कोठारी (रा. माणिकनगर, अहमदनगर) यांनी गुरुवारी (दि.२) रात्री कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. राकेश कांतीलाल गांधी (रा. महादेव अपार्टमेंट, पाईपलाईन रोड), डॉ. आशिष अजित भंडारी ( रा. सारसनगर, अहमदनगर) असे गुन्हा झालेल्या दोघांची नावे आहेत.

फिर्यादी कोठारी व आरोपी हे रेंज फौंडेशन सोसायटी तथा ट्रस्ट या सेवा भावी संस्थेचे आणि बाबाजी हरजी कर्पे पाटील प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांचे विश्वस्त आहेत. यातील डॉ. राकेश गांधी हे रेंज फौंडेशन सोसायटी तथा ट्रस्ट चे स्थापनेपासून अध्यक्ष आहेत.

त्यांनी व डॉ. भंडारी यांनी बाबाजी हरजी कर्पे पाटील प्रतिष्ठान तर्फे छत्रपती संभाजी नगर रोडवरील तवले नगर येथे चालविण्यात येत असलेल्या साई एंजल्स स्कुल च्या इमारतीच्या वरील मजल्यावरी खोल्यांचे बांधकाम करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या स्टेशनरोड शाखेत

८ कोटी ५० लाखांचे कर्जप्रकरण करण्याचे ठरविले त्यासाठी रेंज फौंडेशन सोसायटी तथा ट्रस्ट या संस्थेला जामीनदार करू असे सांगितले. त्यास विश्वस्त असलेले फिर्यादी अमित कोठारी, श्वेता अमित कोठारी व रसिकलाल रसिकलाल चंदुलाल कोठारी (मयत) अशांनी विरोध दर्शविला.

त्यानंतरही विरोध करणाऱ्या विश्वास्थांच्या खोटया सह्या करून खोटी कागदपत्रे तयार करून डॉ. गांधी व डॉ. भंडारी यांनी कर्ज प्रकरण केले. हा प्रकार दि. ९ फेब्रुवारी २०२३ ते दि.१३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडला. आम्ही सह्या केलेल्या नसतानाही

संस्थेला सुमारे ८ कोटी ५० लाखांच्या कर्ज प्रकरणात जमीनदार करून डॉ. गांधी व डॉ. भंडारी यांनी आमचा विश्वासघात करून फसवणूक केली असल्याचे अमित कोठारी यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी डॉ. गांधी व डॉ. भंडारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe