Urea Shortage : गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये नानाविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट यांसारख्या संकटांमुळे बळीराजा बेजार झाला आहे. यावर्षी देखील खरीप हंगामात निसर्गाचे हे दुष्टचक्र शेतकऱ्यांच्या मुळावर उठलं होतं.
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल असं उत्पन्न मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांनी यातून पुढे जाण्याचा आणि रब्बी हंगामातून खरिपाची भरपाई काढण्याचा नेक इरादा अंगीकारला आणि रब्बी हंगामाची पेरणी केली आहे. दरम्यान आता रब्बी हंगामात निसर्गाचे दुष्टचक्र नव्हे तर इतरच कारणामुळे शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे.

खरं पाहता रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आता खतटंचाई जाणवू लागली आहे. पश्चिम विदर्भातील अकोला बुलढाणा वासिम या तीन जिल्ह्यात रब्बी हंगामातील जवळपास सर्वच पिकांची लागवड पूर्ण झाली आहे. पिकांची पेरणी पूर्ण झाल्यानंतर पिकाच्या जोमदार वाढीसाठी साहजिकच खतांची शेतकऱ्यांना नितांत आवश्यकता भासत असते. मात्र अशा वाढीच्या अवस्थेतच या तीन जिल्ह्यात खत टंचाई निर्माण झाली आहे.
रब्बी हंगामातील बहुतांशी पिकांना प्रामुख्याने युरिया या खताचे आवश्यकता असते. याच खताचा या तीन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शॉर्टेज पाहायला मिळत आहे. तब्बल एक महिन्यापासून या जिल्ह्यातील बहुतांशी भागात युरिया खत उपलब्ध नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत खताविना पिकांची वाढ कशी होणार हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसाव पाहत आहे.
आधीच निसर्गाने बेजार केलेल्या बळीराजाला खत टंचाई अधिकचं दुबळी बनवू पाहत आहे. पश्चिम विदर्भातील या भागात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, जवस, ज्वारी, मका अशा विविध पिकांची लागवड पूर्ण झाली आहे. मात्र काही शेतकरी अद्यापही खरिपातील पिके काढून रब्बी लागवडीची तयारी करीत आहेत.
पण बहुतांशी शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पीक पेरणी पूर्ण झाली असून काही शेतकरी बांधवांनी महिना, दीड महिन्यापूर्वी रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली आहे. अशा पिकांना आता खताची दुसरी मात्रा दिली जात आहे. यामध्ये रब्बी हंगामातील मका पिकाला युरियाची दुसरी मात्रा देणे नितांत गरजेचं आहे. मात्र विक्रेत्यांकडून युरियाचा स्टॉक शिल्लक नसल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे.
यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव रिसोड या ठिकाणी प्रामुख्याने युरियाची टंचाई पाहायला मिळत आहे. निश्चितचं युरिया टंचाई शेतकऱ्यांसाठी दुष्काळा तेरावा महिना अशी परिस्थिती तयार करत आहे. यामुळे खत टंचाई जाणवणार नाही असं छातीठोकपणे सांगणारे सरकारचे देखील पितळ उघड पडल आहे एवढं नक्की.