गव्हाच्या ‘या’ नव्याने विकसित झालेल्या जातीपासून शेतकऱ्यांना मिळणार 80 ते 100 क्विंटल पर्यंतचे उत्पादन ! नवीन जातीच्या विशेषता पहा…

हवामान बदलामुळे आणि तापमान वाढीमुळे गव्हाच्या उत्पादनात सातत्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत देशातील कृषी शास्त्रज्ञ शेतकरी बांधवांचे गहू उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी गव्हाच्या नवनवीन जाती विकसित होत आहेत. अलीकडेच देशातील कृषी शास्त्रज्ञांनी गव्हाची एक नवीन जात विकसित केली आहे. एचडी 3385 असे या नवीन जातीचे नाव आहे.

Published on -

Wheat Farming : येत्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सोयाबीन बाजारात दाखल होणार आहे. येत्या काही दिवसात भात, सोयाबीन समवेत सर्वच महत्त्वाच्या खरीप हंगामातील पिकांची काढणी पूर्ण होणार आहे. खरीप पिकांची काढणी पूर्ण झाली की रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला होता तरीही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी करण्यात आली होती. यंदा तर राज्यात चांगला पाऊस झाला आहे. सुरुवातीच्या तीन महिन्यातच मान्सूनने सरासरी चा टप्पा गाठला आहे.

यावर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस राहणार आहे. अशा परिस्थितीत यंदा गहू लागवडीचे क्षेत्र किंचित वाढू शकते असे म्हटले जात आहे. खरे तर गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असेल तरीदेखील या पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये.

हवामान बदलामुळे आणि तापमान वाढीमुळे गव्हाच्या उत्पादनात सातत्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत देशातील कृषी शास्त्रज्ञ शेतकरी बांधवांचे गहू उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी गव्हाच्या नवनवीन जाती विकसित होत आहेत.

अलीकडेच देशातील कृषी शास्त्रज्ञांनी गव्हाची एक नवीन जात विकसित केली आहे. एचडी 3385 असे या नवीन जातीचे नाव आहे. दरम्यान, आता आपण या जातीच्या विशेषतः अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

गव्हाच्या नवीन जातीच्या विशेषता

भारतीय कृषी संशोधन संस्था, कर्नाल या संस्थेने गव्हाची ही उत्कृष्ट जात विकसित केली आहे. गव्हाची ही जात उत्तर-पश्चिम आणि उत्तर-पूर्व मैदानी क्षेत्रासाठी शिफारशीत आहे. या जातीची वेळेवर पेरणी केली जाऊ शकते. या जातीची वेळेवर पेरणी केली तर शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळते.

गव्हाची ही जात तांबेरा रोगास प्रतिकारक असल्याचे म्हटले जाते. पिवळा, तपकिरी आणि काळा या तिन्ही प्रकारच्या तांबेरा रोगास ही जात प्रतिकारक असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे. या जातीपासून सरासरी 60 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.

38 सेंटिमीटर पर्यंत वाढणाऱ्या या जातीपासून जर वातावरण अनुकूल असेल तर हेक्‍टरी 73 ते 74 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवता येणे देखील शक्य असल्याचा दावा केला जातो. महत्त्वाचे म्हणजे या जातीची कमाल उत्पादनक्षमता 80 ते 100 क्विंटल एवढी आहे.

म्हणजेच या जातीपासून शेतकरी बांधव योग्य नियोजनातून आणि हवामान अनुकूल असल्यास 100 क्विंटल पर्यंत देखील उत्पादन मिळवू शकतात. या जातीची ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी केली जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News