Wheat Farming : शेतकऱ्यांनो तयारीला लागा गहू पेरणीचा टाईम आला…! गव्हाच्या ‘या’ जातीची पेरणी करा, 95 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळणार

Ajay Patil
Published:
wheat farming

Wheat Farming : मित्रांनो संपूर्ण देशभरात खरीप हंगाम (Kharif Season) आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. खरीप ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तूर इत्यादी पिकांची आगामी काही दिवसात काढणी प्रत्यक्षात सुरू होणार आहे. खरीप पिकांची काढणी संपल्यानंतर संपूर्ण देशभरात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होते.

शेतकरी बांधव रब्बी हंगामात वेगवेगळ्या पिकांची शेती करत असतात. यामध्ये गहू (Wheat Crop) या पिकाचा देखील समावेश आहे. गव्हाची लागवड संपूर्ण भारत वर्षात केली जाते. पंजाब आणि हरियाणा ही दोन राज्य गहू उत्पादनासाठी संपूर्ण जगात विख्यात आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील गव्हाची लागवड (Wheat Cultivation) विशेष उल्लेखनीय आहे.

राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव (Farmer) रब्बी हंगामात गहू या पिकाची शेती (Farming) करत असतात. अशा परिस्थितीत रब्बी हंगामाला सुरुवात झाली म्हणजे राज्यात गहू पेरणीच्या कामाला देखील वेग येणार आहे. मित्रांनो खरे पाहाता गव्हाच्या वेगवेगळ्या जाती शास्त्रज्ञांनी विकसित केल्या आहेत.

या सुधारित जातीच्या माध्यमातून गहू उत्पादक शेतकरी बांधवांना बक्कळ उत्पादन देखील मिळत आहे. विशेष म्हणजे जाणकार लोक नमूद करतात की गहू पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन आणि उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी नेहमीच गव्हाच्या सुधारित जातींची (Wheat Variety) पेरणी केली पाहिजे.

सुधारित वाणाची पेरणी केल्यास शेतकरी बांधवांचा उत्पादन खर्च कमी होतो आणि हाती मिळणारे उत्पादन वाढत. अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण ज्या गव्हाच्या वाणाविषयी जाणून घेणार आहोत त्या गव्हाची उत्पादनक्षमता तब्बल 90 क्विंटल पर्यंत असल्याचा दावा केला जातो.

अशा परिस्थितीत या गव्हाची लागवड निश्चितच शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे. आज आपण गव्हाच सुधारित वाण HI-8663 विषय सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता भारतातील सर्वोत्कृष्ट गहू वाण HI-8663 याविषयी जाणून घेऊया.

हाती आलेल्या माहितीनुसार आणि मीडिया रिपोर्टमध्ये केल्या गेलेल्या दाव्यानुसार, गव्हाच्या वाणांमध्ये HI-8663 हे नाव सध्या सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या वाणांमध्ये आघाडीवर आहे. त्याच्या उत्पादकतेबद्दल बोलायचे झाल्यास, प्रति हेक्टर 95.32 क्विंटल सांगितले जात आहे. HI-8663 हे जीनोटाइप वैशिष्ट्यपूर्ण, उच्च दर्जाचे आणि उच्च उत्पन्न देणारे गव्हाचे वाण आहे. निश्चितच मीडिया रिपोर्ट मध्ये केलेला दावा जर असेल तर हे वाण शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे.

HI-8663 गव्हाची विशेषता 

HI-8663 मध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, त्यामुळे बाजारात याला खूप मागणी आहे. या गव्हापासून ब्रेड व्यतिरिक्त रवा आणि पास्ता देखील बनवला जातो आणि त्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक आढळते.

या जातीच्या गव्हाच्या पेरणीसाठी योग्य वेळ

साधारणपणे नोव्हेंबर महिना हा गव्हाच्या पेरणीसाठी योग्य मानला जातो, परंतु या जातीची पेरणी डिसेंबर महिन्यातही करता येते. म्हणजेच पसात गहू पेरणीसाठी देखील हे वाण योग्य आहे. याशिवाय, ते इतर जातींपेक्षा लवकर परिपक्व होते आणि उष्णता सहज सहन करू शकते. मध्य प्रदेशात या जातीची लागवड केली जाते. मित्रांनो महाराष्ट्रात अद्याप या जातीची लागवड केलेली आढळत नाही. मात्र मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी या जातीची लागवड निश्चितच फायदेशीर ठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe